'सुकून भरा दिन' : सुनीता केजरीवालांच्‍या पोस्‍टवर स्‍वाती मालीवाल भडकल्‍या

बिभव कुमारांच्‍या जामिनावर दिलेल्‍या प्रतिकियेला दिले प्रत्त्‍युतर
Swati Maliwal
बिभव कुमारांना जामीन मिळाल्‍यानंतर अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्‍नी सुनीता केजरीवाल यांनी दिलेल्‍या प्रतिक्रियेवर स्‍वाती मालीवाल चांगल्‍याच भडकल्‍या आहेत.Filr photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणी मंगळवारी (३ सप्‍टेंबर) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांना तीस हजारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. १०० दिवसांपेक्षा अधिक काळ कोठडीत असलेल्‍या बिभव कुमारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र बिभव कुमारांना जामीन मिळाल्‍यानंतर अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्‍नी सुनीता केजरीवाल यांनी दिलेल्‍या प्रतिक्रियेवर स्‍वाती मालीवाल चांगल्‍याच भडकल्‍या आहेत. त्‍यानी 'एक्‍स'वर पोस्‍ट करत आपली नाराजी तीव्र शब्‍दांमध्‍ये व्‍यक्‍त केली आहे.

तीस हजारी न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांना वैयक्तिक जामीन बॉण्ड आणि प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनावर सोडण्याचा आदेश जारी केला. न्यायालयाने जामिनावर इतर अटीही घातल्या आहेत.

सुनीता केजरीवाल म्‍हणाल्‍या, 'सुकून भरा दिन'

बिभव कुमार यांना जामीन मिळाल्यानंतर मुख्‍यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सुकून भरा दिन (आरामाचा दिवस) अशी पोस्‍ट केली. चित्र कुठलं आणि कुठलं याबाबत काहीच सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने बिभव यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाण्यास बंदी घातली आहे. त्याचवेळी सुनीता केजरीवाल यांच्या या पोस्टनंतर स्वाती मालीवाल आज (दि. ४ सप्‍टेंबर) सकाळी यावर प्रतिक्रिया दिली.

देव सर्व पाहत आहे, न्याय होईल ...

आपल्‍या X पोस्‍टवर स्‍वाती मालीवाल यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्‍या पत्नीला आज खूप आराम वाटत आहे. मला मारहाण आणि शिवीगाळ करणारा माणूस जामिनावर सुटल्‍यामुळे त्यांच्या घराला दिलासा मिळाला आहे. हा सर्वांसाठी स्पष्ट संदेश आहे, महिलांना मारहाण करा, त्यानंतर आम्ही आधी घाणेरडे ट्रोलिंग करू, पीडितेला पूर्णपणे उद्ध्वस्त करू आणि त्या माणसाला न्‍यायालयात वाचवण्यासाठी देशातील सर्वात महागड्या वकिलांची फौज उभी करू! अशी माणसे बघून ज्यांना दिलासा मिळतो त्यांच्याकडून बहिणी-मुलींच्या सन्मानाची अपेक्षा काय? देव सर्व पाहत आहे, न्याय होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमधून व्‍यक्‍त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news