Beed Sarpanch Death | श्रीक्षेत्र बाभळगावच्या उपसरपंचाचा मृतदेह रस्त्यावर आढळल्याने खळबळ

अपघाताची शक्यता; मोटारसायकलचा चुराडा
 Majalgaon Bhabhalgaon Deputy Sarpanch Death
वैजनाथ विठ्ठल लाटेPudhari
Published on
Updated on

Majalgaon Bhabhalgaon Deputy Sarpanch Death

दिंद्रुड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बाभळगाव येथील उपसरपंच वैजनाथ विठ्ठल लाटे (वय ३५) यांचा मृतदेह बुधवारी ( दि. २६) पहाटे भोपा-बाभळगाव रस्त्यावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी त्यांची मोटारसायकल अपघातग्रस्त आणि चकनाचूर झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्राथमिक तपासात अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजनाथ लाटे हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भोपा-बाभळगाव रस्त्याने मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी अज्ञात कारणाने त्यांचा अपघात झाल्याची शक्यता आहे. पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही तरुणांना रस्त्यावर लाटे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्याजवळच मोटारसायकल अपघातग्रस्त अवस्थेत पडलेली होती.

 Majalgaon Bhabhalgaon Deputy Sarpanch Death
Beed News : सांगवी पाटण परिसरात बिबट्याचे दर्शन; वनविभागाकडून ठशांची पाहणी

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बाभळगाव येथे शोकाकुल वातावरणात वैजनाथ लाटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 Majalgaon Bhabhalgaon Deputy Sarpanch Death
Beed Rain News : प्रकल्प कोरडे; पिकांनी टाकल्या माना

गावावर शोककळा

वैजनाथ लाटे हे गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात सक्रिय होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने बाभळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास दिंद्रुड पोलिसांकडून सुरू आहे. अपघात नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाची परिस्थिती, मोटारसायकलची स्थिती आणि उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news