Beed news| फुलसांगवी शिवारात बिबट्याने पाडला घोडा अन् मेंढीचा फाडशा
शंकर भालेकर
शिरूर : तालुक्यातील फुलसांगवी या गावाच्या शिवारामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मेंढपाळांच्या जागली वरती बिबट्याने हल्ला चढवून मेंढपाळाच्या घोड्याची मेंढीची शिकार केली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे फुलसांगवी परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
शिरूर कासार तालुक्यातील मौजे फुलसांगवी या गावाच्या परिसरामध्ये रब्बी हंगामाची शेतीची कामे मोठ्या जोमाने चालू आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना शेतातील कामे वेळेत करणे आव्हानात्मक झाले असताना या कामांना आता बिबट्याच्या दहशतीची मोठी खेळ बसली आहे. शिरूर कासार तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे मोठे धास्तीचे झाले आहे.
शिरूर तालुक्यातील फुलसांगवी या गावांमध्ये शिवारामध्ये सुभाष भुजंगराव ढाकणे या फुलसांगवी मार्कडवाडी रस्त्या लगतच्या शेतकऱ्याच्या 163 मधील शेतामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बिगवण येथील मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप बसवलेला होता. याच ठिकाणी त्यांनी आपली जागलही ठेवली होती. रात्री एक ते दीड च्या दरम्यान या मेंढपाळाच्या जागली वरती बिबट्याने हल्ला चढवून येथील या मेंढपाळाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या घोड्याची व एका मेंढीची शिकार केली आहे. घोड्याच्या नरड्याचा चावा घेऊन त्याला गतप्राणी केले व त्याचे पोटाजवळील मांस भक्षण करून त्या ठिकाणाहून बिबट्या पसार झाला असल्याचे सांगितले आहे.
सदरील घटनेची माहिती पाटोदा वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेमध्ये सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये हजार रुपये किमतीचा घोडा व पंधरा ते वीस हजार रुपये किमतीची मेंढी असा सुमारे एक लाख रुपये किमतीची पशुधन बिबट्याच्या भक्षस्थानी ठरले आहेत. सदरील घटना फुलसांगवी परिसरामध्ये पहिल्यांदाच घडत असल्याने बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकरी वर्ग पुरताच हादरून गेला आहे. खरीप हंगामातील शेती कामालाही मोठी खिळ बसली आहे. या बिबट्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्याला वन विभागाने भयमुक्त करावे अशी शेतकऱ्यातून मागणी जोर धरत आहे.
फुलसांगवी परिसरामध्ये बिबट्याचा वावर हा शेतकऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरामध्ये आवश्यक ते प्रमाणे कॅमेरे व पिंजरा पिंजरा लावून या प्राण्यांना बंदिस्त करावे शेतकऱ्यांना भयमुक्त करावे
भास्कर सानप, सरपंच फुलसांगवी

