Electrocution death news : कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यू

फरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ
Electrocution death news
Electrocution death news
Published on
Updated on

गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत मजुराचे नाव राजेशकुमार बिरबल सैनी (वय 30, रा. राजस्थान) असे आहे.

Electrocution death news
Chandrapur News : एकार्जुना येथे शेतात काम करताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

कोळगाव येथील एका नव्याने बांधण्यात आलेल्या घरात फरशी बसविण्याचे काम सदरील राजस्थानी मजुरांनी घेतले होते. दरम्यान घरातील फरशी काम पूर्ण झाल्यानंतर राजेशकुमार सैनी हे मशीनच्या सहाय्याने फरशी धुवून स्वच्छ करत होते. याचवेळी मशीनमधून किंवा विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

Electrocution death news
Chhatrapati Sambhajinagar Farmer Death | अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, राजेश यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदन केल्यानंतर सदरील मजूर तरुणाचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news