Crime  News
Crime NewsPudhari file photo

Beed Robbery | केज तालुक्यातील डोळ्यात चटणी टाकून सराफाला लुटणारी टोळी जेरबंद; ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Published on

Kej Goldsmith looted

केज : केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफाला अडवून डोळ्यात चटणी टाकत चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीला बीड स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल आणि सहा मोबाईल असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २१ फेब्रुवारी रोजी एक सोनार मोटारसायकलवरून सोने विक्रीसाठी जुन्या डिघोळअंबा रोडने होळकडे जात असताना होळ–डिघोळअंबा दरम्यान दर्ग्याजवळ दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी त्याला अडवले. आरोपींनी त्याच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि हातातील सोन्याची पिशवी हिसकावून फरार झाले.

  Crime  News
Beed Armed Robbery : खळवट निमगावमध्ये सशस्त्र दरोडा

या घटनेप्रकरणी पीडिताच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ४६/२०२६, भा.न्या.सं. ३०९(६) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.

तपासाची दिशा

जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने संशयितांची गुप्त माहिती गोळा केली.

दि. २६ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे रोहित रंजीत धिमधिमे याला अंबाजोगाई बसस्थानकाजवळील राज मेडिकलसमोरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

  Crime  News
Beed robbery : माळेगांव येथे सशस्त्र दरोडा; साडेचार लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी पळविला

तपासात सुदाम गणपत सोनवणे (रा. डिघोळअंबा, ता. धारूर), विरसिंग रिसपालसिंग टाक (रा. अंबाजोगाई), अभिषेक अशोक घाटुळ (रा. कन्हेवाडी, ता. परळी), कानिफनाथ विलास डुरकर (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) आणि यशोदिप कल्याण किर्दन (रा. सातेफळ, ता. अंबाजोगाई) यांचा सहभाग निष्पन्न झाला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालात ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल आणि सहा मोबाईल फोनचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news