Beed Teacher Death | हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याच्या धमकीमुळे शिक्षकाने घेतला गळफास; भावाचा गंभीर आरोप

महिलेवर गुन्हा दाखल करण्यासाठी भावाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Beed Honeytrap Threat Case
Beed Honeytrap Threat Case Pudhari
Published on
Updated on

Beed kaij Teacher Honeytrap Threat Case

केज: दोन महिन्या पूर्वी केज शहरात राहत असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने गळफास घेतला होता. मात्र त्यांना हनीट्रॅप मध्ये फसवून आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेली त्यांची नातेवाईक महिला आणि इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी त्यांच्या भावाने स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सिद्धिविनायक विद्यालयातील सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत वाघमारे यांनी दोन महिन्या पूर्वी दि. ९ जून रोजी केज येथील केज- कळंब रस्त्यावर असलेल्या कमल पेट्रोल पंपा जवळ कोकिळ यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला होता. मृत सूर्यकांत वाघमारे यांची पत्नी देखील केज तालुक्यात महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांना दोन अपत्ये आहेत. एवढा सुखी असताना सूर्यकांत वाघमारे यांनी महिलेचा व तिच्या नातेवाईकांच्या त्रासाला आणि बदनामीला वैतागून गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Beed Honeytrap Threat Case
Beed Crime News: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भावाच्या डोक्यात घातला दगड ; राजाभाऊ यांचा जागीच मृत्यू

मृत्यूनंतर मिळाली माहिती :-

सहशिक्षक सूर्यकांत वाघमारे यांच्या मृत्यू नंतर त्यांचे भाऊ संदीप वाघमारे यांना त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्या कडून अशी माहिती मिळाली की, सहशिक्षक सूर्यकांत वाघमारे यांचे नात्यातील एक विवाहित महिलेसोबत अनैतिक सबंध होते. ती महिला तिच्या मोबाईल वरुन सूर्यकांत वाघमारे यांना सतत फोन करून धमक्या देऊन ब्लॅकमेल करीत असे. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून समाजात बदनामी करू आणि जिवे मारण्याची धमक्या देत असे, म्हणून तिचा फोन आल्यानंतर वाघमारे हे ताणतणावात राहत होते. ते नातेवाईकांशी सुध्दा व्यवस्थित बोलत नव्हते.

गुन्हा नोंदविण्याची मागणी :-

मृत सूर्यकांत वाघमारे यांना त्या महिलेने पाठविलेले तिचे स्वतःचे अर्धनग्न फोटो आणि चॅटिंग व तिच्या पतीने दिलेली धमकीवजा फोन रेकॉर्डिंग हे नातेवाईकांनी पोलिसांना दिले आहेत. परंतु अद्याप त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला नाही.

Beed Honeytrap Threat Case
Beed Crime News: केज तालुक्यात शेतात काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग

१५ ऑगस्ट रोजी भावाने केला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न : महिला आणि तिचा पती व दीर यांचे सर्व कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंग आणि स्क्रीन शॉट यांचे पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यामुळे मृत वाघमारे यांचे भाऊ संदीप वाघमारे यांनी दि. १५ ऑगस्टरोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news