

केज : पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात आज (दि. २५) काढण्यात आली. यावेळी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्यासह नायब तहसीलदार भंडारे, आशा गायकवाड-वाघ, रामटेके, नन्नवरे आदी उपस्थित होते.
अनुसुचित जातींच्या महिलांसाठी सादोळा, बोरीसावरगाव, मोटेगाव, इस्थळ, लाखा, मांगवडगाव, मस्साजोग, लव्हुरी, हनुमंत पिंप्री या ग्रामपंचायती आरक्षित आहेत. तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित नसलेल्या ग्रामपंचायती या सारुळ, कोल्हेवाडी, धनेगाव, सौंदना, साळेगाव, उंदरी, वरपगाव/कापरेवाडी, जवळबन, सोनिजवळा या ९ ग्रामपंचायती आरक्षित आहेत.
अनुसूचित जमातीच्या महिला करीता ढाकेफळ तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या महिलांसाठी आरक्षित नसलेल्या धोतरा या ग्रामपंचायती आरक्षित आहेत.
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी जोला, मुलेगाव, पिट्टीघाट, पिसेगाव, शेलगाव गांजी, सातेफळ, लिंबाचीवाडी, दैठणा, केकाणवाडी, पळसखेडा, सावळेश्वर, दहीफळ वडमाऊली, माळेगाव, नाव्होली, पैठण, नायगाव तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत, डोका, आरणगाव, गप्पेवाडी, काशीदवाडी, नांदूरघाट, दरडवाडी, शिंदी, भोपला, भाटुंबा, आडस, शिरपुरा, केकतसारणी बावची, चिंचोली माळी, कौडगाव
त्यातील खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेली गावे आवसगाव/वाकडी, बानेगाव, बनसारोळा, भालगाव, बोरगाव (बू), दिपेवडगाव, डोणगाव, हादगाव, कळंमअंबा, काळेगाव घाट, कानडी बदन, कानडी माळी, कासारी, कोठी, कुंबेफळ, लाडेगाव, माळेवाडी, मुंडेवाडी, नागझरी, पिंपळगव्हाण, पिराचीवाडी, सासुरा, सुकळी, तरनळी, वाघेबाभूळगाव, विडा/गौरवाडी, लाडेगाव, उमरी, रामेश्वरवाडी, आंधळेवाडी, चंदनसावरगाव, सारणी आनंदगाव आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेली आनंदगाव, आनेगाव, औरंगपुर, बनकरंजा, बेलगाव/केळगाव, देवगाव, धर्माळा, एकूरका, घाटेवाडी, गोटेगाव, होळ, जानेगाव, जाधव जवळा, जीवाचीवाडी/तुकुचीवाडी, केवड, कोरडेवाडी, नारेवाडी, राजेगाव, साबला, सांगवी सारणी, शिरूरघाट/गदळेवाडी, सूर्डी, टाकळी, तांबवा, युसुफ वडगाव, बोबडेवाडी, कोरेगाव, पाथरा, सारणी सांगवी, सोनेसांगवी, येवता या ग्रामपंचायती आहेत.
या सर्व सोडती देवांश मुजमुले या चार वर्षांच्या बालकाच्या हस्ते काढण्यात आल्या.
अ. जा. महिला --- ९
अ. जा. अनारक्षित --- ९
अ. ज. महिला --- १
अ. ज. अनारक्षित --- १
ना. मा. प्र. महिला --- १६
ना. मा. प्र. अनारक्षित-- १५
स. सा. महिला --- ३२
सर्व साधारण --- ३१
एकूण जागा ---- ११४