

अतुल शिनगारे
धारूर : धारूर तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज (दि. 25) तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी तहसीलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी ढाकणे आदीसह नागरिक उपस्थित होते.
धारूर तालुक्यातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षाकरिता 2025 ते 2030 या दरम्यान गठीत होणा-या ग्रामपंचायतीकरिता आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.
आरक्षण तपशील सरपंच पदे पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये अनुसुचित जाती-09 पदे, अनुसूचित जमाती-02 पदे, नागरिकांचा मागास प्रवर्ग-15 पदे, खुला प्रवर्ग-30 पदे असे एकूण 56 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली.
पिपरवाडा, मोहखेड, चिखली, शिगणवाडी
थेटेगव्हाण, काटेवाडी, उंमरेवाडी, कोळपिंपरी, हिंगणी,
आंबेवडगाव, महिला सरपंच धुनकवड,
बोडका, चिंचपूर , सुरनरवाडी, चोंडी, गोपाळपूर, कोयाळ, देवठाणा,
व्हरकटवाडी, मैंदवाडी, भोगलवाडी, तांदळवाडी, संगम, अमला -निमला, फकीर जवळा, सुकळी
पहाडी दहिफळ, चारदरी, कोथिंबीर वाडी, असरडोह, अंजनडोह, चोरंबा, गांजपूर, हिंगणी, जहागीर मोहा, कारी, मोरफळी, मुंगी, पांगरी, रुई धारूर, सोनीमोहा,
तेलगाव , भोपा, आरणवाडी , आसोला, गावंदरा, घागरवाडा, कन्नापूर, कासारी, खोडस, कुंडी, आवरगाव, वाघोली, पहाडी पारगाव, देवदहिफळ, चाटगाव अशी 56 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली.