Kej Crime | केज तालुक्यात जुन्या वादातून तलवारीने हल्ला; चुलत भावासह दोघांवर गुन्हा दाखल

केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे घटना
 Crime News
Crime News pudhari
Published on
Updated on

Sword Attack kej Beed

केज : जुन्या वादाच्या कारणावरून मोटारसायकलवरून जात असलेल्या युवकाच्या पायावर तलवारीने वार करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे घडली. या प्रकरणी चुलत भावासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हेवाडी (ता. केज) येथील वाहन चालक महादेव प्रकाश आघाव (वय २६) यांचे पाच दिवसांपूर्वी शेतात ट्रॅक्टर घालण्याच्या कारणावरून त्यांचा चुलत भाऊ अशोक मच्छिंद्र आघाव याच्यासोबत वाद झाला होता. या जुन्या वादातूनच ११ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली.

 Crime News
Kej girls missing case : केज शहरातून दोन महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

महादेव आघाव हे लव्हुरी येथून आपल्या गावाकडे मोटारसायकलवरून येत असताना रस्त्यावर अशोक आघाव व त्याचा साथीदार बालाजी पांडू तांदळे (रा. कोरेगाव) उभे होते. यावेळी चालत्या मोटारसायकलवरील महादेव आघाव यांच्या पायावर बालाजी तांदळे याने तलवारीने वार केला. त्यानंतर अशोक आघाव याने “ट्रॅक्टर का अडवले?” असे म्हणत शिवीगाळ केली व “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत दोघेही तेथून निघून गेले.

या घटनेप्रकरणी महादेव आघाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालाजी पांडू तांदळे व अशोक मच्छिंद्र आघाव यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ अन्वये भा. न्या. सं. कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जमादार हनुमान मुंडे करीत आहेत.

 Crime News
Kej Crime | केज तालुक्यात मोटारसायकलवर मित्राच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

जागेच्या मालकीवरून पत्र्याचे शेड कटरने कापले; दुकानातील सामानाची तोडफोड करून रस्त्यावर फेकले
चार महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज : जागेच्या मालकीच्या वादातून दोन ट्रेडर्स व ट्रेडिंग कंपनीच्या पत्र्याच्या शेडला कटरने कापून दुकानातील सामान व फर्निचरची तोडफोड करून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना केज शहरातील शनी मंदिर गल्ली परिसरात घडली. या प्रकरणी चार महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहरातील शनी मंदिर गल्ली भागात नंदकुमार शंकरराव सत्वधर यांचे पत्र्याच्या शेडमध्ये वेदांत ट्रेडर्सअरहान ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. ८ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास मनोज सुरेशराव कदम, मयुर सुरेशराव कदम, महेश केशव कदम, तारामती केशव कदम, सुमन शाम माळी, शालन वैजनाथ गोरे आणि विजयमाला साखाराम काळे हे तेथे आले.

यावेळी “ही जागा आमची आहे, तुम्ही येथून निघून जा, अन्यथा तुमच्यावर विनयभंगाची खोटी तक्रार करून तुला व तुझ्या भावाला तुरुंगात टाकू,” अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर पत्र्याचे शेड कटरने कापून दुकानातील सामान व फर्निचरची तोडफोड केली आणि दुकानातील साहित्य बाहेर रस्त्यावर फेकून दिले. या प्रकारात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार नंदकुमार सत्वधर यांनी दिली आहे.

 Crime News
Kej accident news | केज-कळंब रोडवर उभ्या ट्रकला एसटीची जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

या तक्रारीवरून मनोज कदम, मयुर कदम, महेश कदम, तारामती कदम, सुमन माळी, शालन गोरे आणि विजयमाला काळे या सात जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार महावीर सोनवणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news