Kej Police Station | केज पोलीस ठाण्यात भाऊबंदकी उफाळली; भावा-भावांत मारामारी

अंमलदारांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Kej  Police Station Fight
Kej Police Station FightPudhari
Published on
Updated on

Kej Police Station Fight

केज : परस्परांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या भावा -भावांमध्येच वाद चिघळून थेट हाणामारी झाली. या घटनेप्रकरणी ठाणे अंमलदारांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. २४) दुपारी सुमारे ३:४५ वाजता केज पोलीस ठाण्यात जुनेद शाकेर शेख, मुसईब शाकेर शेख (दोघे रा. खाजा नगर, केज), तसेच सईद शाकेर शेख (रा. स्लाबेल अपार्टमेंट, डी. एन. रोड, मुंबई) आणि सलाउद्दीन नबाब काझी (रा. टिपू सुलतान चौक, कळंब रोड, केज) हे एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले होते.

Kej  Police Station Fight
Kej Taluka Crime | बायकोशी पंगा पडला महागात: मेव्हण्याने भावजीला धरून आपटले; सूनेने घेतला सासूचा चावा

पोलीस ठाण्यात समोरासमोर येताच त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यांनी एकमेकांना मारहाण करत झोंबाझोंबी केली तसेच आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

या प्रकरणी ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असलेले पोलिस जमादार उमेश आघाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वाघमारे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news