Kej Crime | बेपत्ता मुलीच्या चौकशीसाठी गेलेल्या आई-वडिलांना धमकी: दांपत्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १९ वर्षीय मुलगी बेपत्ता
Atrocity Act case
Atrocity Act case Pudhari
Published on
Updated on

Missing Girl Investigation kej beed

केज : मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून चौकशी करण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आई-वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की व धमकी दिल्याप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारीरोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. याबाबत मुलीच्या वडिलांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

Atrocity Act case
Kej Crime | केज तालुक्यात जुन्या वादातून तलवारीने हल्ला; चुलत भावासह दोघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, त्याच गावातील एक मुलगाही बेपत्ता असल्याने त्यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याची माहिती मुलीच्या पालकांना मिळाली. यानंतर मुलीचे आई-वडील संबंधित मुलाच्या घरी चौकशीसाठी गेले असता, तेथे त्या मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दोघा पती-पत्नीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२/२०२६ अंतर्गत ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(एस), ३(२)(व्हीए) तसेच भा.न्या.सं. कलम ११८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news