Beed News : सांगवीतील ‌‘चांदीचा खजिना‌’ तहसीलकडे; शेकडो नाणी गायब?

केवळ 250 नाणी जप्त; घटनास्थळ सील करण्याची ग््राामस्थांची मागणी
Silver coins treasure Sangvi
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे सापडलेल्या खजान्यात चांदीची नानी सापडली. मात्र त्यातील नानी मोठ्या प्रमाणावर गायब झाल्याने हा मुद्दा तालुक्यात चर्चेचा ठरला आहे.pudhari photo
Published on
Updated on

आष्टी : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे सापडलेल्या चांदीच्या ऐतिहासिक नाण्यांचा मुद्दा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीमध्ये सापडलेली नाणी प्रशासनाने जप्त करून तहसील कार्यालयात जमा केली असली, तरी मोठ्या प्रमाणावर नाणी गायब झाल्याच्या चर्चेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी शशिकांत खुटाळे यांच्या घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात काही मुलांना चांदीची नाणी आढळली. या घटनेची माहिती मिळताच रविवारी कडा पोलिस चौकीचे अधिकारी व महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून 250 नाणी जप्त करण्यात आली. सोमवारी ही नाणी तहसीलदारांच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपासासाठी ती पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.

Silver coins treasure Sangvi
Illegal sand mining Mahur : माहूरमध्ये वाळूमाफियाची पीएसआयला धक्काबुक्की

मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या मते घटनास्थळी नाण्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर होता. काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 4 ते 5 किलो वजनाची नाणी सापडली होती. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या 250 नाण्यांचा आकडा कमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शनिवारी रात्री पुन्हा खोदकाम झाल्याची चर्चा असून, त्यावेळी काही नाणी लंपास झाल्याचा आरोप ग्राम स्थांकडून होत आहे.

दरम्यान, या जागेवर अजूनही नाणी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ती जागा तात्काळ सील करावी, गायब नाण्यांचा शोध घेण्यासाठी संबंधितांची चौकशी करावी आणि शास्त्रोक्त उत्खनन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण किंवा राज्य पुरातत्व विभागामार्फत करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तहसील प्रशासनाने जप्त नाणी सुरक्षित ठेवल्याचे सांगितले आहे.

Silver coins treasure Sangvi
Latur Accident : मालट्रकला कारची धडक, एक ठार, तीन गंभीर

पुरातत्त्व विभागाच्या अहवालानंतरच या नाण्यांचा ऐतिहासिक कालखंड व नेमके महत्त्व स्पष्ट होणार आहे. मात्र, चांदीच्या खजिन्या भोवतीचे गूढ कायम असल्याने तालुक्यात उत्सुकता आणि संशयाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news