Beed Accident | केज-कळंब मार्गावर मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू; रात्रभर निर्जनस्थळी मृतदेह

सकाळी शेतात जाणाऱ्यांना आढळला
Kej Kalamb Highway Accident
उत्तरेश्वर उबाळे Pudhari
Published on: 
Updated on: 

Kej Kalamb Highway Accident

केज : केज-कळंब मार्गावरील साळेगाव येथून शेलगाव गांजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. उत्तरेश्वर महादेव उबाळे (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. अपघातानंतर रात्रभर त्यांचा मृतदेह रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडून होता. शुक्रवारी सकाळी शेतात जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर उबाळे हे १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकल (एमएच १४, डीडी ८३९०) वरून केजहून साळेगाव, शेलगाव गांजीमार्गे युसुफवडगावकडे जात होते. साळेगाव (गांजी फाटा) ते शेलगाव गांजी रस्त्यावरील एका वळणावर त्यांची मोटारसायकल अचानक घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Kej Kalamb Highway Accident
Beed Accident News : वारकऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात

अपघाताचे ठिकाण अडवळणाचे असून हा परिसर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतो. तसेच रस्त्यालगतच्या खड्ड्यात उत्तरेश्वर पडल्याने आणि परिसरात अंधार असल्याने रात्रीच्या वेळी हा अपघात कोणाच्याही निदर्शनास आला नाही. त्यामुळे ते रात्रभर घटनास्थळीच पडून राहिले.

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास शेताकडे जाणाऱ्या काही नागरिकांना उत्तरेश्वर हे रस्त्यालगत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल महावीर सोनवणे आणि बाबजी दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उत्तरेश्वर यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

उत्तरेश्वर उबाळे यांच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news