Beed Burglary | सैनिकाच्या घरात घरफोडी; रोख रकमेसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

केज तालुक्यातील कदमवाडी येथे घटना
Kej Kadamwadi Theft Case
Kej Kadamwadi Theft CaseAI Photo
Published on
Updated on

Kej Kadamwadi Theft Case

केज : केज तालुक्यातील कदमवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी सैनिकाच्या घरात घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५२ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन नरहरी कदम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या पंजाब येथे सेवेत आहेत. त्यांच्या गावी पत्नी, मुले आणि आई-वडील वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी त्यांचे आई-वडील उपचारासाठी अहिल्यानगर येथे गेले होते. तर पत्नी आशालता कदम या मुलाला ताप असल्याने त्याच्यासह घराच्या हॉलमध्ये झोपल्या होत्या.

Kej Kadamwadi Theft Case
Beed Crime | विलास घुले खून प्रकरण : सहा आरोपींच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

२९ जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर हॉलच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून त्यांनी शेजारच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील लोखंडी कपाट आणि बेडखाली ठेवलेले ७० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरी झालेल्या ऐवजात सोन्याच्या विविध अंगठ्या, चार तोळ्यांचे सोन्याचे पट्टी गंठण, एक तोळ्यांचे नेकलेस, ११ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर, सोन्याचे तीन 'ओम', तसेच चांदीच्या चैन, करंडे आणि जोडव्यांचा समावेश असून, एकूण चोरीचा ऐवज ३ लाख ५२ हजार ६५० रुपये इतका असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Kej Kadamwadi Theft Case
Beed News : नरेगा कामांच्या चौकशीसाठी पंचायत समितीच्या इमारतीवर चढून आंदोलन

या प्रकरणी आशालता सचिन कदम यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news