Kej Accident | केजजवळ दोन कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी

केज–मांजरसुंबा महामार्गावर उमरी पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडक
Car Crash Kej  Beed
केज–मांजरसुंबा महामार्गावर उमरी पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडकPudhari
Published on
Updated on

Car Crash Kej Beed

केज : केज–मांजरसुंबा महामार्गावर उमरी पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. जखमींना पोलिसांच्या मदतीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि. १०) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षकांचे सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड (रा. चिंचोली माळी, ता. केज) आणि त्यांचे सहकारी सिद्धेश्वर देवसन आदमाने (रा. बीड) हे स्विफ्ट डिझायर (क्र. एमएच-४४ एस-७४३२) कारने बीडकडे जात होते.

Car Crash Kej  Beed
Kej accident news | केज-कळंब रोडवर उभ्या ट्रकला एसटीची जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

त्याच वेळी बीडकडून केजकडे येणारी टाटा अल्ट्रॉस (क्र. एमएच-२३ बीएच-६५६६) कार यांच्यात केज–मांजरसुंबा महामार्ग क्र. ५४८-डीवरील गंगामाऊली साखर कारखान्याजवळील कदमवाडी फाट्याजवळ, चंद्रकांत खरात यांच्या आदित्य बिअर बार अँड परमिट रूमसमोर समोरासमोर धडक झाली.

या अपघातात टाटा अल्ट्रॉस कारमधील शिवराज रविंद्र माने, रवि संतराम शिंदे व अनिल आत्माराम मोरे हे तिघे तसेच स्विफ्ट डिझायर कारमधील मधुकर बालासाहेब गायकवाड व सिद्धेश्वर देवसन आदमाने हे दोघे जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

Car Crash Kej  Beed
Kej Accident | केज येथील कानडी रोडवर मद्यधुंद चालकाचा थरार; दोघांना उडवून कार थेट दुकानात

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, जमादार गित्ते, संतोष गित्ते, शिवाजी कागदे, तांबारे, रामहरी शिंदे, नितीन मेटे तसेच गृहरक्षक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ॲम्ब्युलन्स चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, केज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातातील जखमी :
१) शिवराज रविंद्र माने (वय ३३, रा. बीड)
२) रवि संतराम शिंदे (वय ३३, रा. बीड)
३) अनिल आत्माराम मोरे (वय ३२, रा. बीड)
४) सिद्धेश्वर देवसन आदमाने (वय २०, रा. बीड)
५) मधुकर बालासाहेब गायकवाड (वय ५४, रा. चिंचोली माळी, ता. केज)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news