Gopinathrao Munde Spinning Mill Fraud | केज येथील गोपीनाथराव मुंडे सूतगिरणीतील गैरप्रकार उघड; चेअरमन, लिपिकावर फसवणुकीचा गुन्हा

Kej News | सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरुकमारे यांची केज पोलीस ठाण्यात तक्रार
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

Gopinathrao Munde Spinning Mill Fraud

बीड : माहिती अधिकारातून मिळवलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी केज येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे तत्कालीन अध्यक्ष आणि लिपिक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरू तुरुकमारे (रा. बीड) यांनी १७ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मुलगा ऋषिकेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, तो २०१६-१७ मध्ये बीड येथील केशरबाई क्षीरसागर महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्या काळात त्याचे जात पडताळणी प्रमाणपत्र जिल्हा समितीमार्फत ३० मार्च २०१७ रोजी जारी करण्यात आले होते.

Fraud Case
Kej accident news | केज-कळंब रोडवर उभ्या ट्रकला एसटीची जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

तक्रारीनुसार, सूतगिरणीतील तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांनी माहिती अधिकाराचा वापर करून जानेवारी ते मार्च २०१७ दरम्यान विविध कारणांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवली. २०१७ ते २०२० या कालावधीत एकूण ४६४ जणांची कागदपत्रे त्यांच्या हाती लागली.

यानंतर, तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे आणि लिपिक वाव्हळे यांनी संगनमताने या प्रमाणपत्रांचा वापर करून संबंधितांची संमती न घेता त्यांना सूतगिरणीचे सभासद म्हणून नोंदवले. ही यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करून प्रमाणितही करून घेतल्याचा आरोप आहे.

Fraud Case
Kej News | साळगाव जनावरांच्या आठवडी बाजारात बैल उधळला, दिसेल त्‍या वाहनाला धडक मारत सुटला!

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने संबंधित कार्यालयाकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर संबंधित यादी रद्द करण्यात आली. मात्र, संमतीशिवाय नावांचा वापर करून सभासदत्व दाखवल्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news