

19 Year Old Girl Missing Kej
केज: कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १९ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना केज शहरात घडली आहे. मुलीच्या वडिलांनी केज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास केज शहरातील एका भागात राहणारी १९ वर्षीय युवती वडील कामानिमित्त परळी येथे गेले असताना आईला कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली. तरीही ती न आढळून आल्याने तिच्या वडिलांनी केज पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे.
बेपत्ता युवतीचे वर्णन असे : रंग सावळा, उंची सुमारे ५ फूट, अंगात फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस व त्यावर पांढऱ्या रंगाचे जॅकेट, पायात चप्पल, गळ्याजवळ ऑपरेशनची खुण असून हातात काळ्या व पिवळ्या रंगाचा दोरा बांधलेला आहे.
सदर युवती कोणास आढळून आल्यास केज पोलीस ठाणे किंवा नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे यांनी केले आहे.