Beed Bribe Case | चहा पिण्याच्या बहाण्याने भूमापक कार्यालयाबाहेर आला अन् 'एसीबी'च्या जाळ्यात अडकला

केजमध्ये ३० हजारांची लाच मागणाऱ्या भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
Kaij Land Surveyor Bribe Case
Kaij Land Surveyor Bribe Case Pudhari
Published on
Updated on

Kaij Land Surveyor Bribe Case

केज : शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी झाल्यानंतर क्षेत्र दुरुस्ती करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. केज तहसील कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावरील एका हॉटेलमध्ये १० हजार रुपये लाच स्वीकारताना भूमापक माणिक वाघमारे याला एसीबी पथकाने जेरबंद केले.

या प्रकरणाची माहिती अशी की, केज तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकऱ्याने दि. १८ डिसेंबर रोजी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत अधिकृतपणे आपल्या जमिनीची मोजणी करून घेतली होती. मात्र जमिनीच्या जुन्या निजामकालीन अभिलेखांमध्ये क्षेत्र कमी असल्याचे कारण सांगत भूमापक माणिक वाघमारे याने दुरुस्ती करून देण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन ३० हजार रुपयांवर व्यवहार ठरला.

Kaij Land Surveyor Bribe Case
Beed Bribe Case | गेवराई पंचायत समितीच्या अभियंत्याला १ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी अटक

यातील ५ हजार रुपये तक्रारदार शेतकऱ्याने त्याच दिवशी दिले होते, तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले. मात्र उर्वरित पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी करून सत्यता पडताळल्यानंतर सापळा रचला. तक्रारदाराकडे देण्यासाठी अँथ्रासीन पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या तसेच व्हॉईस रेकॉर्डर लावून सापळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली.

दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता तक्रारदार शेतकरी भूमिअभिलेख कार्यालयात गेला आणि भूमापक वाघमारे याला १० हजार रुपये लाच देण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे तहसील कार्यालयासमोरील केज–माजलगाव रोडवरील पोलिस स्टेशन शेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले. तेथे वाघमारे याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला रंगेहात पकडले.

Kaij Land Surveyor Bribe Case
Beed Bribe News | गेवराईत वाळू माफियांकडून लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात सापडला; एसीबीची कारवाई

सरकारी पंचांसमक्ष झडती घेऊन लाचपोटी घेतलेली रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई जालना विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केली. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चहाच्या बहाण्याने अडकला जाळ्यात

तक्रारदार शेतकऱ्याने “साहेब, बाहेर चहा घेऊ, तिथे पैसे देतो,” असे सांगून भूमापक वाघमारे याला कार्यालयाबाहेर बोलावले. याच ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्यांसमोर वाघमारे याने बिनधास्तपणे लाच स्वीकारली आणि अलगद एसीबीच्या जाळ्यात अडकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news