गेवराई, पुढारी वृत्तसेवा : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर दोघांनी अत्याचार करून पीडित महिला व तिच्या सासूला मारहाण केली ही घटना गुरुवारी (दि. १७) बीडमधील गेवराईत उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव (ता. गेवराई) येथील २१ वर्षीय महिला गुरुवारी (दि. १७) सकाळी सहा वाजता राम गिते यांच्या शेतातील बांधावर जनावरांना गवत आणण्यासाठी गेली होती. या ठिकाणी जनार्धन गिते व गोवर्धन गिते हे दोघे उसाची भिजवणी करीत होते. त्यातील एकाने या महिलेशी लगट करुन तुझे लग्न झाले का ? मला तु खुप आवडते, असे म्हणत असताना पाठीमागून दुस-याने तिचे डोळे बांधले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने सर्व प्रकार घरातील कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर संशयितांनी महिला आणि तिच्या सासूला मारहाण केली.
गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी जनार्धन गिते, गोवर्धन गिते आणि राम गिते (रा. खामगाव, ता. गेवराई, जि.बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू करीत आहेत. (Beed Crime News)