

गेवराई : तालुक्यातील वडगाव सुशी येथे सोमवार दि.७ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घराची पडझड होऊन शेतातील काही झाडे उन्मळून पडली आहेत. तर वादळी वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की घरावरील तसेच जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे देखील अर्धा किलोमीटर पर्यंत उडून गेली आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात बसवलेली सौर पंपाचे देखील वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जीवीत हानी टळली पण घरांसह सौर पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी येथे सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.तर प्रचंड झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरांवरची पत्रे देखील अर्धा किलोमीटर पर्यंत अंतरावर उडून गेले आहेत. यामुळे वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. या वादळी पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.