

Beed Ghatnandur ganja seizure
परळी वैजनाथ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने “ऑपरेशन थंडर” अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आज (दि.८) मोठी कारवाई करत 12 किलो 186 ग्रॅम गांजा जप्त केला. एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत 2 लाख 43 हजार 720 इतकी आहे.
घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकाजवळील रेल्वे पटरीच्या पुढील आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घाटनांदूर परिसरात गांजाचा साठा असल्याची खात्री करून पंचासमक्ष आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 12 किलो 186 ग्रॅम गांजा मिळून आला. आरोपी निहाल रामभाऊ गंगणे (रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र केकान, विष्णू सानप, दिलीप गीते आणि गोविंद भताने यांनी केली. पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.