

Georai youth killed tractor accident
गेवराई : गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे शेतात काम सुरू असताना ट्रॅक्टरची भीषण धडक बसून एक तरुण ठार झाला. ही हृदयद्रावक घटना १० डिसेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात दुपारी सुमारे ३ वाजता ट्रॅक्टर चालक चक्रधर मोहिते यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (MH-23 BH-0330) हा निष्काळजीपणे व वेगात चालवला. यादरम्यान त्यांनी शेतात असलेल्या निलेश यास जोरात धडक दिली. या अचानक झालेल्या धडकेत निलेशच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. जखमा इतक्या गंभीर होत्या की त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी अनिल पंडीत बहिर (रा. गंगावाडी) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक चक्रधर मोहिते यांच्या विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.