Maratha Protest | व्वा रे पठ्ठे! मुंबई महापालिकेसमोर भररस्त्यावरच मराठा आंदोलकांनी मांडला कबड्डीचा डाव

Maratha Protest Update | गेवराई तालुक्यातील मराठा आंदोलकांनी कबड्डी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले
Maratha Protest kabaddi  Mumbai
गेवराई तालुक्यातील मराठा आंदोलक कबड्डी खेळताना (Pudhari Photo)
Published on
Updated on

Maratha Protest kabaddi Mumbai Maratha Protest Update

सुभाष मुळे

गेवराई : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे. त्यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील ४ आमदार व एक खासदार यांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाज बांधवांनी आता वज्रमूठ आवळली असून दुसऱ्या दिवशीही ऊर्जा कायम राहिली आहे. आझाद मैदान खचाखच भरले आहे. रस्ते जाम झाल्याने भर रस्त्यावरच बीड जिल्ह्यातील आंदोलकांनी 'कबड्डी'चा खेळ मांडल्याचे चित्र समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आरक्षणावर समाज बांधव एकवटल्याचे आज पहावयास मिळत आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर व आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मुंबई गाठली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय एकत्रित आल्याने प्रशासनाची दमछाक झाली. मैदानावर जागा नसल्याने बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील मराठा आंदोलकांनी भर रस्त्यावरच 'कबड्डी'चा खेळ मांडला.

Maratha Protest kabaddi  Mumbai
Maratha reservation: मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर विखे-पाटलांची मोठी घोषणा; म्हणाले, "मनोज जरांगे..."

भर रस्त्यावर कबड्डीचा डाव

मराठा आंदोलकांना सरकार कितीही अडथळे आणो, आंदोलकांचा जोश कमी होत नाही. मुंबई महापालिका समोरच गेवराई तालुक्यातील सिरसदेवी आंदोलकांनी आज मैदान सजवलं आणि थेट कबड्डीचा खेळ मांडला. त्यामुळे आंदोलनाची ऊर्जा, जोश आणि खेळकरपणा पाहून मुंबईकर थक्क झाले. हीच खरी मराठा ताकद, लढा आणि खेळ दोन्ही एकाच वेळी हे देखील मुंबईकरांना पहावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news