बीड : चारचाकी आणि दुचाकीला अपघात; दोन गंभीर जखमी

जिंतूर पोलिसांच्या मदतीमुळे दोघांचे प्राण वाचले
Beed accident News
माजलगाव दरम्यान दोन वाहनांची धडकFile Photo
Published on
Updated on

माजलगाव : प्रतिनिधी

माजलगाव पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर खरात आडगाव पाटी ते रामनगरच्यामध्ये भरधाव चारचाकीने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तपास कामी जात असलेल्या जिंतूर पोलिसांनी सदर अपघातस्थळी तात्काळ मदत केल्यामुळे या दोघांचे प्राण वाचले आहेत.

Beed accident News
लेहमध्‍ये भीषण अपघात, बस दरीत कोसळून ६ ठार

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खरात आडगाव पाटी ते रामनगरच्या मध्ये सपना हॉटेलच्या समोर चारचाकी क्रमांक (एमएच १२ केएन 5365) समोरून येत असलेल्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील शाबीर आली महमूद शेख (वय.52) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात दरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल राणी चोपडे कवठेकर, पीसी कांबळे हे तपास कामी माजलगाव कडे जात असताना त्यांनी या अपघात स्थळी थांबून या जखमींना मदत केली तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे यांना उपचार मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत जखमी रुग्णांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news