लेहमध्‍ये भीषण अपघात, बस दरीत कोसळून ६ ठार

लग्‍नासाठी जाताना दुर्घटना, २२ प्रवासी जखमी
Leh, Ladakh
लेहमध्‍ये बस दरीत कोसळून झालेल्‍या भीषण अपघातात सहा जण ठार तर २२ प्रवासी जखमी झाले.Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लेहमध्‍ये बस दरीत कोसळून झालेल्‍या भीषण अपघातात सहा जण ठार तर २२ प्रवासी जखमी झाले आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे. लेहमधील दुर्बुक भागात ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच मदत पथकाने घटनास्‍थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

लग्‍नाला जाताना काळाचा घाला

बसमध्ये दोन मुले आणि २३ शालेय कर्मचाऱ्यांसह २५ प्रवासी होते. शाळेतील आपल्‍या सहकार्‍याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सर्वजण दुर्बुकला जात होते. एका वळावर बस खोल दरीत कोसळली. जखमींना लष्कर आणि सीएचसी तांगत्से आरोग्य सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती लेहच्या उपायुक्तांनी दिली.

बचावकार्यासाठी तीन हेलिकॉप्टर तैनात

जखमींना लेह येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी प्रशासनाने तीन हेलिकॉप्टर तैनात केले. भारतीय लष्कर, लडाख पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून जखमींना आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचवण्यास मदत करून बचाव कार्ये वेगाने सुरू केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news