Beed Success Story : बापाच्या जिद्दीला अन् लेकीच्या मेहनतीला सलाम: इंजेगावच्या सालगड्याची मुलगी होणार डॉक्टर

वैष्णवी मुंडे नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.
वैष्णवी मुंडे नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.
Published on
Updated on

[author title="प्रा.रविंद्र जोशी" image="http://"][/author]

परळी वैजनाथ: इंजेगाव येथील एका सालगड्याची मुलगी चक्क नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. आई आणि वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात आणि त्यांना साधी अक्षर ओळख ही नाही. मात्र, वडिलांच्या जिद्दीला आणि मुलीच्या मेहनतीला फळ मिळाले. इंजेगाव येथील वैष्णवी भरत मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घवघवीत यश मिळवले. या यशाचा ग्रामस्थांना अभिमान असून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वैष्णवी मुंडे मात्र, याचे सर्व श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना देते. Beed Success Story

Beed Success Story : भरत मुंडे सालगडी म्हणून काम करतात.

भरत पंढरीनाथ मुंडे आणि चांगुणाबाई मुंडे या इंजेगाव येथील दाम्पत्याची वैष्णवी ही मुलगी… अल्पभूधारक शेतकरी असलेले भरत मुंडे हे इतरांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात. त्यामुळे गरिबी आणि आर्थिक अडचण ही पाचवीला पुजलेली… भरत मुंडे यांना दोन्ही मुलीच… वैष्णवी अत्यंत हुशार असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही भरत मुंडे यांनी तिला परळी येथील न्यू हायस्कूल शाळेमध्ये शिकवले. दहावीला तब्बल 98.60 टक्के गुण घेत तिने वडिलांनी टाकलेला विश्वास सार्थ करुन दाखवला.

तिच्या या यशाने भरत मुंडे यांची छाती अभिमानाने भरून आली. वैष्णवीला अगदी लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि दहावीला मिळालेल्या गुणांनी तिची ही इच्छा अधिक तीव्र झाली. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे ती निराश व्हायची. भरत मुंडे यांनी वैष्णवीची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चयच केला.

पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही.

वडिलांचा आधार आणि प्रोत्साहन मिळताच वैष्णवीने आपल्या डॉक्टर होण्याच्या इच्छेला बळ दिले. दहावीच्या परीक्षेत 98.60 % गुण मिळाल्याने लातूर येथील दयानंद सायन्स कॉलेज येथे प्रवेश घेतला आणि अभ्यासक्रमात सोबतच नीट परीक्षेच्या अभ्यासालाही गती दिली. जोरदार प्रयत्न करूनही पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळाले नाही. मात्र, तिने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले. वडील भरत मुंडे यांनीही पोटाला चिमटा दिला. मात्र, लेकीच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही. वडिलांच्या साथीला आई चांगुणाबाई ही खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि इतरांच्या शेतामध्ये काम करून पै पै जमा केली आणि लेकीच्या शिक्षणासाठी पैसा लावला.अखेर बापाच्या जिद्दीला आणि लेकीच्या मेहनतीला फळ मिळालेच. नीट परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये वैष्णवी भरत मुंडे हिरा तब्बल 637 गुण मिळाले आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Beed Success Story : मुलीची इच्छा पूर्ण करायची एवढेच ध्येय होते – भरत मुंडे

मुलगी वैष्णवी हिची डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून आम्ही जास्तीत जास्त मेहनत केली. वैष्णवीनेही आमच्या मेहनतीचे पांग फेडले. काहीही करून वैष्णवीला डॉक्टर करायचे एवढेच ध्येय होते आणि तेवढेच ठरवून मी आणि माझ्या पत्नीने काम केले. आमच्या मेहंदीचे चीज झाले आणि वैष्णवी जिद्दीलाही फळ मिळाले याचा आम्हालाच नाही. तर संपूर्ण गावाला सुद्धा आनंद आणि अभिमान आहे.

आई-वडिलांचे श्रम वाया गेले नाही याचा अभिमान

आमची कौटुंबिक परिस्थिती अतिशय गरीब असल्याने माझे दहावीनंतर शिक्षण होईल की नाही असा प्रश्न होता. मात्र, आई आणि वडिलांनी तू फक्त शिक्षणावर लक्ष दे, बाकीचे आम्ही बघू, असा शब्द देऊन पाठीवर आधाराची थाप मारली आणि मी सुद्धा पुन्हा मागे फिरून न पाहता केवळ अभ्यासाकडे लक्ष दिले. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर मी खूप निराश झाले होते. अनेकांचे टोमणे ही ऐकून घेतले. मात्र, आई आणि वडिलांनी खचून जाऊ नको. तू प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असा आधार दिला. त्यामुळेच मी आज हे यश संपादन करू शकले. मी लहानपणी बघितलेले स्वप्न आज साकार होत असल्याचा आनंद वेगळा आहे.
– वैष्णवी मुंडे, विद्यार्थिनी

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news