बीड : खासदार सोनवणेंची अचानक जिल्‍हा रूग्‍णालयाला भेट; शल्‍यचिकित्‍सक गैरहजर

खासदार बजरंग सोनवणें
खासदार बजरंग सोनवणें

गौतम बचुटे/केज (बीड) नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी अचानक बीड जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील दुरावस्था व घाणीचे साम्राज्‍य आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी ऐकून ते चांगलेच भडकले. ही पहिली वेळ असल्याने माफ करतो, मात्र जर यात सुधारणा झाली नाही आणि दुसऱ्यांदा हा प्रकार घडला तर माफ करणार नाही अशी तंबी त्‍यांनी यावेळी दिली.

बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनावणे यांनी निवडून येताच कामाला मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. दि. १३ जून रोजी त्यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी जिल्हा रुग्णालयाची प्रचंड दुरावस्था आणि गैरसोय व घाणीचे साम्राज्य आणि स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बडे हे गैरहजर असल्याने खासदार महोदय चांगलेच भडकले. त्यांनी कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स यांना चांगलेच फैलावर घेतले.

खासदार बजरंग सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक दिलेल्या भेटीमुळे कर्मचारी, अधिकारी आणि कामचुकार डॉक्टरांची भंबेरी उडाली. तर रुग्ण आणि नातेवाईक यांच्याकडून कौतुक होत आहे. दरम्यान विविध विभागाला अशा अचानक भेटी देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतल्यास अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांची होणारी अडवणूक व अधिकाऱ्यांच्या मुजोरपण आणि कामचुकारपणा यांना आळा बसेल अशी मागणी होत आहे.

काय म्हणाले खा. बजरंग सोनवणे :-

  • सीसीटीव्ही त शल्यचिकित्सक कधी आले आणि कधी गेले हे दाखवा
  • शल्य चिकित्सक हलचल रजिस्टर दाखवा
  • त्यांना जर घरची कामे असतील तर त्यांनी घरीच बसावे
  • परिसरात घाणीचे साम्राज्य का ?
  • सरकारी डॉक्टरांनी त्यांचा युनिफॉर्म वापरावा
  • त्यांच्या अंगावर ॲप्रन नसल्याने डॉक्टर कोण हे कसे समजेल?
  • प्रचंड दुरवस्था पाहून खासदार भडकले

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सायंकाळच्या सुमारास बीडच्या जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट केली. खासदार रुग्णालयात पोहोचताच कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी पाडाच वाचून दाखवला. रुग्णाच्या नातेवाईकांचे रडगाणे ऐकून आणि जिल्हा रुग्णालयातील दुरावस्था पाहून खासदार बजरंग सोनवणे हे चांगलेच भडकले. माजी सरप्राईज व्हिजिट होती. त्यामुळे मी आता संधी देतोय दुसऱ्यांदा आल्यावर असं काही आढळून आल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच खासदार सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news