

बीड : बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हा शाखेने शिक्षण विभागातील मोठा मासा सुमारे १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID) घोटाळ्यात धुळ्यातील संशयित प्रशांत तुळशीराम वाडिले याला अटक केली आहे.
या अटकेचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटले असून बीड जिल्ह्यातील संस्थाचालक,शिक्षण विभागातील अधिकारी, पे युनिट मधील अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षक यांचे धाबे दणाणले असून यातील काही जन ही चक्क अटकपूर्व जामिनासाठी वकिलच्या शोधत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान नाशिक आर्थिक गुन्हा शाखेची एक टीम बीड मध्ये येणार असून वाडिलेच्या मोबाइल मधील माहिती वरुन ते पुढील तपास करत आहे.
वाडिलेच्या मोबाइल मधून मोठ्या प्रमाणावर शलयार्थ बोगस आय डी कोणी कोणी काढले, कोणकोण कडे किती भारती झाली तसेच या करीत किती मंत्रालयात पैसे दिल या सर्व बाबी आर्थिक गुन्हा शाखेच्या तपासात निशापाणं होत असून नाशिकच्या शाखेचे पथक ही बीड जिल्ह्यात कुठल्याही क्षणी येऊन धरपकड करेल यात शंका नाही,त्यामुळे आतापासूनच काही ना-ना करता चक्क अटकपूर्व जामिनासाठी वकिलचा शोध घेत आहेत.
दरम्यान या संदर्भात नाशिक येथील आर्थिक गुन्हा शाखेच्या तपास अधिकारी श्री एस. एस शेख यांच्याशी दैनिक पुढारीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या तपास हा मुख्य टप्प्यावर असून तपासतील काही महत्वाच्या बाबी उघडकीस येणार असून यावर बोलणे उचित होणार नाही . जेव्हा तपास पूर्ण होईल तेव्हा आपल्याशी सविस्तर माहिती दिली जाईल .
एकूणच राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणाने आता चांगलेच वळण घेतले असून जय पद्धतीने विशेष तपास पथकाने याचा तपास केला त्यावरून आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आणि खोल आहे ही लक्षात आले असून यातील सखोल तपास हा एक दीड वर्षापासून सुरूच आहे. या प्रकरणात अडकलेले संस्था चालक तसेच अधिकारी-कर्मचारी तसेच काही दलाल यांच्यावर आता कारवाईचा बडगा हा नक्की उचलला जाणार असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटत असून दैनिक पुढरीने यावर उठवलेला आवाज या बद्दल समाधान देखील व्यक्त करत आहे.
सामाजिक कार्यकर्ते इजि. सादेक इनामदार यांनी याबाबत पुढरीशी बोलताना सांगितले की दैनिक पुढरीने हे प्रकरण कायम लाऊन धरले त्यामुळे जिल्ह्यात झालेली शिक्षक बोगस भरती याला आता चांगला नये मिळेल,शिवाय यातील जे मुख्य आरोपी आहेत, संस्था चालक, शिक्षक, तसेच पे युनिट मधील कर्मचारी यांना लगाम बसेल. यातील गुन्हेगारणा शसंच झाले पाहिजे जेणे करून पुनः अशी लबाडी आणि तरुणांच्या भविष्य सोबत कोणी खेळ करणार नाही. लवकरच यातील खरे गुन्हेगार हे पोलिसांच्या ताब्यात असतील असा विश्वास आपल्याला आहे.