Teacher Recruitment Scam | बोगस शिक्षक भरती : बनावट आवक-जावक क्रमांकाचा झोल

'एसआयटी'च्या तपासात गंभीर बाब उघड; स्वतंत्र चौकशी समिती लवकरच बीडमध्ये दाखल होणार
Teacher Recruitment Scam
Teacher Recruitment Scampudhari photo
Published on
Updated on

बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या व राज्याला हादरवणाऱ्या बोगस शिक्षक भरती प्रकरणाचे धागेदोरे आता अधिकच गडद होत चालले आहेत. या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागलेल्या नवीन तपासात अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे.

बोगस पद्धतीने भरती झालेल्या शिक्षकांना वितरीत करण्यात आलेल्या बनावट आदेशांवर शिक्षण विभागातील आवक-जावक क्रमांक अत्यंत बनावट व नियमबाह्य पद्धतीने नोंदवण्यात आल्याचे उघड झाले आहे. 'दैनिक पुढारी'ने या महाघोटाळ्यावर सुरुवातीपासूनच सातत्याने आणि रोखठोक पाठपुरावा केला असून, आज पुन्हा एकदा या प्रकरणात नवी मोड उघडकीस आली आहे.

Teacher Recruitment Scam
Foreign Fund Scam : २,१४३ कोटींचा परदेशी निधी गैरव्यवहार; उदगीरचा सीए कलानीला पोलिस कोठडी

शिक्षण विभागातील काळ्या कारभारावर प्रकाश टाकताना 'दैनिक पुढारी'ने यापूर्वीही अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आणल्या होत्या. एसआयटीच्या तपासादरम्यान समोर आलेल्या या बनावट आवक-जावक क्रमांकाच्या गैरप्रकारामुळे शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनातीलच काही लाचखोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा संपूर्ण बनाव रचला गेल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

विशेष तपास पथकाने दिलेल्या या अहवालामुळे बीड शिक्षण विभागाचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात आता स्वतंत्र चौकशी समिती बीडमध्ये नेमकी कधी दाखल होते आणि चौकशीअंती आणखी कोणकोणत्या 'बड्या माशां'चा बुरखा फाटतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती आणि कागदपत्रांमधील हेराफे-रीबाबत 'दैनिक पुढारीने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून प्रशासनाला हादरवून सोडले होते. दैनिक पुढारीच्या या निर्भीड बातमीदारीची दखल घेत विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली असून, आता चौकशीचा फास भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गळ्याभोवती आवळला जात आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आता एक स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

ही स्वतंत्र चौकशी समिती लवकरच बीड जिल्ह्यात दाखल होणार असल्याची महत्त्वाची माहिती शिक्षण उपसंचालक दातखिळ यांनी दिली. ही समिती बीडमध्ये येऊन बनावट आदेश, आवक-जावक रजिस्टर, मूळ नस्ती आणि तत्कालीन जबाबदार कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करणार आहे. तपासात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही लहान-मोठ्या अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, त्यांच्यावर कडक काय-द्यानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही उपसंचालक दातखिळ यांनी दिला आहे.

Teacher Recruitment Scam
Maratha Reservation Protest : २९ ऑगस्टच्या आंदोलनावर मनोज जरांगे ठाम

बीड शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा हा केवळ एक प्रशासकीय गैरव्यवहार नसून, भावी पिढीच्या भविष्याशी केलेला क्रूर खेळ आहे. बनावट आवक-जावक क्रमांक देऊन बोगस शिक्षकांना सेवेत समाविष्ट करण्याचे हे षड्यंत्र अत्यंत गंभीर आहे. आम्ही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर पुराव्यानिशी लेखी तक्रार वरिष्ठ स्तरावर दाखल केली आहे. या घोटाळ्यात सामील असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्या पासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे आणि या प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सादेक इनामदार सामाजिक कार्यकर्ते, बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news