Beed prison suspension : कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

कर्तव्यात अनियमितता आढळल्याने वरिष्ठ कार्यालयाचा दणका; कारागृह पुन्हा चर्चेत
Beed prison suspension
Beed prison suspensionpudhari photo
Published on: 
Updated on: 

बीड : बीड जिल्हा कारागृहातील कार्यालयीन कामकाजात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अनियमितता आढळून आल्याने वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्याविरुद्ध निलंबनाचे आदेश जारी केल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे गेल्या काही काळापासून विविध कारणांनी चर्चेत असलेले बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

कारागृहातील कार्यालयीन कामकाजाशी संबंधित असलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत अनियमितता आढळून आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आणि दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, नेमकी कोणती अनियमितता आढळली, त्याचे स्वरूप काय होते आणि कोणत्या कारणास्तव निलंबनाची कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत स्तरावर सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Beed prison suspension
Dharashiv drought situation: पिके करपली; तातडीने मदतीची गरज

दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांवर झालेली कारवाई नेमकी केवळ कर्तव्यातील अनियमिततेमुळे झाली की कारागृहातील काही बंदिवानांना नियमबाह्य पद्धतीने सहकार्य केल्याच्या कोणत्याही बाबीचा त्याच्याशी संबंध आहे, याबाबत कारागृह परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलेल्या कारणांनुसारच कारवाई झाल्याचे सांगण्यात येत असून, प्रत्यक्ष निलंबन आदेशातील कारणे आणि चौकशीत समोर आलेल्या बाबी स्पष्ट झाल्यानंतरच या कारवाईचे नेमके स्वरूप समोर येणार आहे.

Beed prison suspension
Jalna crime : आष्टी परिसरात अवैध वृक्षतोडीवर कारवाई

बीड जिल्हा कारागृहातील दोन कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असली, तरी त्यांच्या कर्तव्यात नेमकी कोणती अनियमितता आढळली, याची माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. कारागृहात चर्चेत असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना ही कारवाई झाल्याने विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी आरोपींना नियमबाह्य सहकार्य केले होते का किंवा निलंबनाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, हे अधिकृत चौकशी अथवा आदेशातील स्पष्ट कारणे समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कारागृहात बड्या आरोपींचा मुक्काम

बीड जिल्हा कारागृहात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड याच्यासह या प्रकरणातील अन्य चार आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक हेही न्यायालयीन कोठडीत असल्याने कारागृहातील सुरक्षा, प्रशासन आणि कार्यालयीन कामकाजाकडे विशेष लक्ष आहे. अशा परिस्थितीत कार्यालयीन कामकाजातील दोन कर्मचाऱ्यांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईने विविध चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news