

Panchayat Samiti draw 2025
धारूर : धारूर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत आज (दि. १३) तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोडत कार्यक्रमाला तहसीलदार श्रीकांत निळे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, नायब तहसीलदार दळवी, नायब तहसीलदार प्रकाश गोपड आदी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तहसील कार्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केले. आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी एक वाजता सुरू झाली. पारदर्शक पद्धतीने लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनंतर धारूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढली असून विविध राजकीय पक्ष व उमेदवार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्तरावर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
आरक्षण पुढीलप्रमाणे :
तेलगाव गण – सर्वसाधारण
मोहखेड गण – अनुसूचित जाती महिला
भोगलवाडी गण – सर्वसाधारण
धुनकवाड गण – सर्वसाधारण महिला
आसरडोह गण – सर्वसाधारण (महिला)
जहांगीर मोहा गण – ओबीसी