Beed Crime | धारुरमध्ये किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; गंभीर जखमी

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटनाः शहरात खळबळ
Beed Crime
धारुरमध्ये किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला
Published on
Updated on

धारूर : धारूर शहरात किरकोळ कारणावरून एका युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी घडली. या हल्ल्यात पानटपरी चालक हनुमंत शिवाजी फावडे (वय 27, रा. गायकवाड गल्ली, धारूर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

Beed Crime
Beed Crime | अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच अपहरणकर्ता पसार

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या पान टपरीचालक फावडे यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Beed Crime
Beed crime news: जातीवाचक शिवीगाळ करून तरुणाला बेदम मारहाण, केज तालुक्यातील संतापजनक घटना

जखमी फावडे यांना तात्काळ धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे सह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपी सध्या फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news