Beed Crime | गुंगीचे औषध देऊन चुलत्याने केला विवाहित पुतणीवर लैंगिक अत्याचार, केज तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना

नराधम चुलत्या विरुद्ध गुन्हा दाखल, पाच महिन्यानंतर घटना उघडकीस, युसुफ वडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हा
Beed Crime
Beed Crime Pudhari
Published on
Updated on

केज :- तालुक्यातील एका खेडेगावातील ५० वर्षीय चुलत चुलत्याने आपल्या 25 वर्षीय विवाहित पुतणीला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तब्बल पाच महिन्या नंतर उघडकीस आली आहे.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाच महिन्या पूर्वी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी एक २५ वर्षीय विवाहित तरुणी ही तिच्या माहेरी आई-वडिलांकडे आली असताना शेत वस्तीवर शेजारी राहत असलेल्या तिच्या चुलत्याने दुपारी १:३० ते ३:३० वाजण्याच्या दरम्यान त्या विवाहित पुतणीला पाण्यातून गुंगी येणारे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार नंतर ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या आई, वडिलांना जीवे मारून टाकीन. अशी धमकी दिल्यामुळे पिडीत मुलीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती.

परंतु त्या नंतर माहेरी आल्या नंतर तिने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्या नंतर शनिवारी सायंकाळी पिडीत मुलीच्या फिर्यादी वरून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात चुलत चुलत्या विरुद्ध गु. र. नं. ६८/२०२६ भा. न्या. सं. ६४(२)(एफ),३५१ (२ ) नुसार अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत बर्डे हे पुढील तपास करीत आहेत.

पोलिस आरोपीच्या मागावर

अत्याचार केल्या नंतर आरोपी हा फरार असून तो जिल्ह्या बाहेर राहत आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र पुतणीचा संसार उध्वस्त करणाऱ्या आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news