Beed Crime News | घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू

खासदार बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप
Bajrang Sonawane railway demand
Bajrang Sonawane pudhari photo
Published on
Updated on

केज : टाकळी (ता.केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या संवेदनशील गुन्ह्यातून पीडित कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक असतानाच, राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझा मुलगा सौरवचे नाव यात जाणीवपूर्वक ओढले जात आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी, आमचे सीडीआर काढावेत, आम्ही तपासाला सहकार्य करू, अशी भुमिका खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडली.

Bajrang Sonawane railway demand
Ambajogai crime news | अंबाजोगाई शहरात गुंडगिरी पुन्हा बोकाळू लागली; विद्यार्थ्यांवर तिघांकडून जीवघेणा हल्ला

माध्यमांशी संवाद साधताना खासदार सोनवणे म्हणाले, टाकळी येथील घटनेशी आमचा दूरवरचाही संबंध नाही. माझी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. या चौकशीअंती किंवा या गुन्हेगारी कटात माझा मुलगा अथवा मी स्वत: कुठेही दोषी आढळलो, तर आमच्यावर कायद्यानुसार जी कठोर कारवाई करायची आहे ती प्रशासनाने नि:संकोचपणे करावी. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत.

Bajrang Sonawane railway demand
Beed cattle slaughter allegations: बकरी ईदच्या दिवशी माजलगावात २०० हून अधिक गोवंशांची कत्तल झाल्याचा आरोप

दरम्यान, या वादाला राजकीय रंग देऊन जिल्ह्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांचा प्रयत्न केला जात आहे. जर उच्चस्तरीय चौकशीमध्ये आमचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले, तर मग केवळ राजकीय आकसापोटी आमच्यावर बेछूट आरोप करणाऱ्यांवर आणि आपल्या प्रक्षोभक वक्तव्यातून बीड जिल्ह्यात अराजकता माजवू पाहणाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेत जे आरोपी असतील त्यांना तातडीने अटक करावी आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील खा.सोनवणे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news