Beed crime news | कोयत्याचा धाक दाखवून 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपी स्वतः पोलिसांसमोर राहिला हजर
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : एका ट्रॅक्टर ड्रायव्हरने ऊसतोड मजुरांच्या अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर दोन वेळा बळजबरीने बलात्कार केलेल्या प्रकरणातील आरोपी स्वतः पोलिसांत हजर झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, एका ऊसतोड मजूर असलेल्या कुटुंबातील १३ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला ऊसतोड मजुरांच्या टोळीतील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर सूरज अशोक खरात (रा.जामरुन, चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी) याने कोयत्याने जीवे मारण्याचा धाक दाखवून दि. १४ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वा. चे सुमारास सुर्डी (सोने सांगवी) ता. केज शिवारातील रोडगे यांचे शेतात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्या नंतर दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याने त्या अल्पवयीन मुलीवर केज पोलिस ठाणे हद्दीतील हदगाव डोका ता. केज शिवारातील बनसोडे यांचे शेतात कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने बलात्कार केला.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारी वरून दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री सूरज अशोक खरात याच्या विरुद्ध युसुफवडगाव ता. केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३४/२०२६ भा. न्या. सं. ६४, ६४(२) (एम), ३५१ यासह पॉक्सोचे कलम ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या पासून आरोपी सुरज खरात हा फरार होता. दरम्यान दि. २० फेब्रुवारी रोजी आरोपी सुरज खरात हा स्वतः पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्या पुढे हजर झाला. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत असून पुढील तपासा संदर्भात बलात्कार प्रकरणातील आरोपी सुरज खरात याला न्यायालया समोर हजर करून पुढील तपास करण्यात येणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news