

केज :- एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेले केजचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी दिली आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. १८ सप्टेंबर, गुरुवार रोजी सायंकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी ही तिच्या मानलेल्या मावशी सोबत केक आणण्यासाठी रस्त्याने जात होती. त्यावेळी केज येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हा त्यांना नाष्टा व चहा पाणी करण्याच्या निमित्ताने त्याच्या चार चाकी गाडीत बसवून कोल्हेवाडीकडे घेऊन गेला. निर्जनस्थळी गाडी थांबवून गाडीमध्ये त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरून जात त्या अल्पवयीन मुलीने व तिच्या सोबतच्या महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर त्या रस्त्याने मागून आलेल्या एका वाहनामुळे घाबरून जात लक्ष्मण बेडसकर हा त्याची गाडी आणि मोबाईल तेथेच ठेवून पळून गेला.
या घटनेनंतर दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट घेऊन हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि शिक्षण विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार त्यांना सांगितला होता. त्या नंतर दि. १९ सप्टेंबर रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल शिक्षण विभागाने त्या रंगेल प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना निलंबित केले आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी यांनी दिली आहे.
बेडसकर अद्यापही फरार
गट बेडसकर हे गुन्हा दाखल झाल्या पासुन फरार असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी दोन पोलिस पथके रवाना करण्यात आली हात. मात्र अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
बेडसकर यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
बेडसकर यांचे एका महिलेसोबतचे अश्लील आणि लैंगिक संबंधाचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायल होत असून त्यामुळे प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.
वादग्रस्त अधिकारी
लक्ष्मण बेडसकर हे वेगवेगळ्या प्रकरणात वादग्रस्त असून या पूर्वी त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने केलेल्या छाप्यात अडकले होते.