Beed News | मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून मजुराने उचलले टोकाचे पाऊल

Farmer End of Life News
Farmer End of Life News
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : मुलीच्या लग्नासाठी हात उसने घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विवंचनेतून केज तालुक्यात एका मजुराने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सोनीजवळा (ता. केज) येथील रंजीत यादव वैरागे वय (४३ वर्ष) असे जीवन संपवलेल्या मजुराचे नाव आहे.

हे मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवित होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी लोकांकडून व नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन मुलीचे लग्न केले होते. हाताला नियमित रोजगार नसल्याने हे पैसे कसे फेडायचे ? या विचाराने ते चिंताग्रस्त होते. शेवटी रंजीत वैरागे यांनी टोकाचे पाऊल उचलले.

३१ जानेवारी रोजी रात्री ७:३० वा.च्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचा भाऊ बाळासाहेब वैरागे यांच्या खबरीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार पठाण हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news