

माजलगाव : माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांचे खंदे समर्थक माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळुंके यांच्यासह त्यांच्या समर्थकावर अशोक सोळुंके यांच्या दुकानात जाऊन हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये धाव घेतली होती मागिल दोन महिन्यांपुर्वी २महिन्याचा आंतरीम जामीन दिला होता.
या आंतरिम जामिनाची मुदत सुशिल सोळंके यांनी मा.उच्च न्यायालयात धाव घेतली असता फिर्यादिचे वकील एडवोकेट सुदर्शन सोळंके यांनी जोरदार युक्तिवाद केला. मा. उच्च न्यायालयाने सुशील सोळंके यांचा जामीन अटकपूर्व जामीन फेटाळुन लावल्याने त्यांना मोठी चपराक बसलेली आहे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे मा. न्यायमुर्ती अरुण पेडणेकर यांनी हा जामिन फेटाळला आहे.
पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे अशोक बाळासाहेब सोळंके याने सुशिल साळुंके व इतर ६ आरोपीविरुध्द तक्रार दाखल केली होती. फिर्यादीत म्हटले होते की, आरोपी सुशिल साळुंके याची आई ग्रामपंचायत सरपंच आहे. फिर्यादी व त्याच्या भावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आरोपीच्या आई विरोधात प्रचार केला होता. फिर्यादीने ग्रामपंचायत कारभाराविरुध्द उपोषण केले होते. तू आमच्या विरोधात उपोषण का करतोस या कारणास्तव आरोपीतांनी फिर्यादीच्या दुकानात बेकायदेशिररित्या प्रवेश करुन त्याला मारहाण केली व दुकानातील वस्तुंची मोडतोड करुन नुकसान केले. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. सुदर्शन जी. साळुंके व अॅड. अमोल गायकवाड यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅड. एन.बी. पाटील यांनी काम पाहिले
माजलगाव पं.स.चे माजी उपसभापती सुशिल सोळंके हे आ.प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक आसल्याने त्यांच्या वरदहस्ताने त्यांना पोलिसांनी अटक केली नसल्याने ते माजलगाव राहुन त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता. आता जामिन फेटाळल्याने सुशिल सोळंके यास कधीही अटक होऊ शकते. पण पोलिसांच्या भुभिकेकडे माजलगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.