

माजलगाव : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतच्या २०२५-३० साठी सरपंच पदाच्या आरक्षणाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि.२५) तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष रुईकर यांच्या नियंत्रणाखाली जाहीर करण्यात आली. आरक्षण सोडत करण्यासाठी गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळक, धस एल.एल., आर्सुल टी.एस., सोळंके पंडित, लांडगे एस. डी., चव्हाण एम.व्ही., शिंदे पी.सी., आवारे एम.बी., मुंडे आर.बी. यांनी काम पाहिले.
अनुसूचीत जमाती महिला
शिंपेटाकळी
अनुसूचीत जाती महिला
राम पिंपळगाव,रोशनपुरी, शृंगारवाडी,सुरुमगाव,सरवर पिंपळगाव,शिंदेवाडी पात्रुड,शेलापुरी,खानापुर,पुनंदगाव,ब्रम्हगांव,मानूर,शुक्लतीर्थ लीमगाव,गव्हाणथडी,पुरुषोत्तमपुरी,कोथरुळ
नागरिकाचा मागास प्रवर्ग
शहापुरमजरा,शहाजानपूर,छत्रबोरगाव,शिंदेवाडी,वां.,गोविंदपूर,सोमठाणा,वांगी बु.,लहानेवाडी,गंगामसला,नागडगाव, लोणगाव,केसापुरी,टाकरवण, मोठेवाडी, सिमरी पारगाव, गोविंदवाडी, मनुरवाडी, रेनापुरी ,सुलतानपूर ,सांडस चिंचोली, लुखेगाव, रिधोरी, घळाटवाडी, सादोळा, तेलगाव खुर्द.
सर्वसाधारण
चोपनवाडी, राजेवाडी, फुल पिंपळगाव, लामेवाडी, देवखेडा,सुरडी नजीक, पिंपळगाव नाकले ,हिवरा (बु), आनंदगाव, खेर्डा खुर्द, साळेगाव ,उमरी( बु),भाटवडगाव ,तालखेड,काळेगावथडी, महातपुरी,बेलुरा,दिंद्रुड, सोन्नाथडी ,निपाणी टाकळी, टालेवाडी, वाघोरा, खतगव्हाण, पात्रुड
सर्वसाधारण महिला
मोगरा, एकदारा,धनगरवाडी- पायतळवाडी, गुंजथडी, किट्टी आडगाव, देपेगाव, बाभळगाव ,खरात आडगाव, बोरगाव, नाकलगाव,माली पारगाव, लवूळ, वारोळा, मंगरूळ ,चिंचगव्हाण, पिंपरी खुर्द,बाराभाई तांडा, हारकी निमगाव, मंजरथ, राजेगाव, नित्रुड ,आबेगाव, सावरगाव,फुले पिंपळगाव.