Beed Crime News: गोड बोलून विश्वास जिंकला अन् हातचलाखीने दागिने चोरले; परळीतील सराफा दुकानातून साडेपाच लाखांचे सोने लंपास

gold theft
gold theftPudhari
Published on
Updated on

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

Jeweller shop theft Parli Beed: परिचित व्यक्तीची ओळख सांगत विश्वास संपादन करून सराफ दुकानातून टप्प्याटप्प्याने सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार परळी शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत ५ लाख ७१ हजार ८६ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

gold theft
Nashik Crime : भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटणाऱ्या 'बंटी-बबली' दाम्पत्याला अटक, अंबड पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथनगर येथील गोविंद माधवराव मुंडे (वय ४०) हे स्टेशन रोडवरील एक मिनार चौक परिसरात 'मुंडे ज्वेलर्स' नावाचे सोन्या-चांदीचे दुकान चालवितात. १७ एप्रिल २०२६ रोजी विठ्ठल सानप (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) हा संशयित दुकानात आला. त्याने मुंडे यांच्या परिचयातील व्यक्तीची ओळख सांगून विश्वास संपादन केला.

gold theft
Nashik Ambad Police | भाडेकरू बनून घरमालकांना लुटणाऱ्या 'बंटी-बबली'ला बेड्या

यानंतर १७ एप्रिल, २८ मे, २ जून, २३ जून आणि २७ जून २०२६ या दिवशी तो दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. या काळात त्याने संधी साधून विविध सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. संशयित प्रत्येक वेळी एकटाच येत असल्याने फिर्यादीला संशय आला.

२७ जून रोजी दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा साठा तपासला असता काही दागिने कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता संशयित दागिने खरेदी करतानाच चोरी करत असल्याचे स्पष्ट झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

gold theft
Chain Snatching : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे पाचजण जेरबंद

चोरीस गेलेल्या ऐवजात एक अंगठी, एक राजा-राणी मंगळसूत्र, पाच मंगळसूत्र वाट्या, सहा जोड कानातले आणि एक पेंडंट अशा एकूण ३७.५९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, त्यांची किंमत ५ लाख ७१ हजार ८६ रुपये आहे.

याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दीपक राठोड पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news