Beed Crime | मोबाईल मधील नोटमुळे डॉ. मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचे गूढ उकलले

मैत्रीण ब्लॅकमेल करत असल्याची डॉ मंदार यांच्या भावाकडून अंबाजोगाई पोलिसांमध्ये तक्रार दाखल
Beed Crime |  डॉ. मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचे गूढ उकलले
Beed Crime | डॉ. मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचे गूढ उकलले
Published on
Updated on

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचे गुढ त्यांचे बंधू लौकिक दाभाडे यांनी त्यांच्या मोबाईलवर पाठवलेल्या पासवर्डने उकलले असून मैत्रिणीकडून होत असलेल्या ब्लॅकमेलमुळे डॉ मंदारने आत्महत्येचे पाऊल उचलण्याचे यातून उघड झाले आहे. अंबाजोगाई शहरातील चनई रोडवर असलेल्या संत रोहिदास नगर मधील रमेश सातपुते यांच्या घरी किरायाने रहात असलेल्या रुमवर ६ एप्रिल रोजी पहाटे मंदारने आपल्या मोबाईल वरून भाऊ लौकिक यास मोबाईलचा पासवर्ड पाठवून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती

मंदारच्या अंत्यविधीनंतर लौकिकने आपल्या मोबाईलवर आलेल्या पासवर्ड 0980 ओपन करून पाहिला असता मंदारच्या मोबाईल मध्ये एक सुसाईड नोट मिळून आली असून या सुसाईड नोटमध्ये वरुन त्याचा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या व सद्यस्थितीत संत रोहिदास नगर याच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मित्राच्या घटस्फोटीत बहिणी सोबत त्याचे मैत्रीचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले. सदर मैत्रीण मंदार यास मी प्रेग्नेंट असल्याने माझ्यासोबत लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेल असे वारंवार धमकी देत होती. शिवाय त्यास अश्लील व्हिडिओ व मेसेज पाठवत होती. यामुळे मंदार हा हताश झाला होता व त्यातूनच मंदारने आत्महत्या करण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पुढे आले आहे.

Beed Crime |  डॉ. मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचे गूढ उकलले
Beed Crime | डॉक्टर विद्यार्थ्याने गळफास घेतल्याने अंबाजोगाईत खळबळ

या सुसाईड नोटमध्ये मंदारने सॉरी पप्पा व भैय्या असा उल्लेख करून आपल्या वडिलांची व भावाची माफी मागितली असून याप्रकरणी भाऊ लौकिक दाभाडे यांनी अंबाजोगाई शहर पोलिसात रीतसर तक्रार दिली आहे. लौकिक यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीसात सदर महिलेविरुद्ध आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास हा पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली ससाणे हे कार्य आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news