NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड प्राध्यापक कुलकर्णी मूळ बीडचा

शाहूनगरात व्यापारी संकुलाचे बांधकाम; जागा हडपल्याचा आरोप
NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Casepudhari photo
Published on
Updated on

बीड : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने लातूरमधून अटक केलेले निवृत्त रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

कुलकर्णी याचे बीडमध्ये वडिलोपार्जीत घर होते, त्या ठिकाणी आता व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असल्याने नीट घोटाळ्यातील पैशातूनच हे सर्व काम सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच गृहनिर्माण संस्थेची व मंदिरासाठी ठेवलेली खुली जागा हडपल्याचाही कुलकर्णी यांच्यावर स्थानिकांचा आरोप आहे.

NEET Paper Leak Case
Oil Price Rise | भारताला दुहेरी तेलफटका

नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी असलेला रसायनशास्त्र विषयाचा प्रा. कुलकर्णी हा मूळ बीडचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो लातूर येथेच स्थायिक झाल्याने बीडमध्ये त्याचा फारसा संपर्क नाही. परंतु बीड येथे वडिलोपार्जीत घर असल्याने काही जणांशी त्याचा संपर्क होता.

विशेष म्हणजे हे जुने घर नुकतेच पाडण्यात आले असून त्या ठिकाणी सध्या नवीन बांधकाम सुरू आहे. त्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणात बीडचा संदर्भ समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच प्रा. कुलकर्णी यांनी विविध ठिकाणी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची, मालमत्तेची आणि संभाव्य व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही स्थानिकांकडून पुढे येत आहे.

NEET Paper Leak Case
Nashik Agriculture Export Crisis | नाशिकच्या कांदा-द्राक्षाला युद्धाची झळ! 1500 कंटेनर जेएनपीटीवर अडकले; खासदारांची केंद्र सरकारकडे धाव

जागा हडप केल्याचा स्थानिकांचा आरोप

प्रा. कुलकर्णी याचे बीडमधील वडिलोपार्जीत घर व त्याच्या शेजारी असलेली गृहनिर्माण संस्थेची जागा तसेच मंदिराचा ओपनस्पेस असे एकत्रीत व्यापारी संकुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गृहनिर्माण संस्थेची व मंदिरासाठी ठेवलेली खुली जागा हडप करून व्यापारी संकुल बांधले जात आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. या सर्व बांधकामाची चौकशी करावी, मूळ जागा कोणाची, त्यावर कोणी अतिक्रमण केले, याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी आता केली आहे. एकीकडे नीट घोटाळ्यात आरोपी म्हणून अडकलेला कुलकर्णी आता बीडमधील बांधकामाच्या प्रश्नावरून देखील अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news