12 exam cheating case : कॉपी प्रकरणी 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल

बीडच्या चौसाळा परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
12 exam cheating case
कॉपी प्रकरणी 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल pudhari photo
Published on
Updated on

बीड : बारावीच्या परीक्षेत ‌‘कॉपीमुक्त अभियाना‌’ला हरताळ फासणाऱ्या बीडच्या चौसाळा परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या केंद्रावर चक्क केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्याचे ड्रोन आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांच्या फिर्यादीवरून केंद्रप्रमुखासह 17 शिक्षकांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

12 exam cheating case
Beed News : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 11 वसतिगृहे

बीड तालुक्यातील चौसाळा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीचा पेपर सुरू असताना सर्रास कॉपी सुरू होती. प्रशासनाने या केंद्रावर ड्रोनद्वारे नजर ठेवली असता, काही व्हिडिओ समोर आले. त्यानंतर प्रशासनाने केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, धक्कादायक वास्तव समोर आले.

यात खुद्द केंद्रप्रमुख आणि काही शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार निदर्शनास येताच जिल्हाधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

यापूर्वी जिल्ह्यात अनेकदा कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत, परंतु थेट केंद्र संचालक आणि एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे शिक्षणप्रेमींचे म्हणणे आहे.

12 exam cheating case
Illegal opium cultivation : कांद्याच्या आडमध्ये अफूचा मळा फुलला

या 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल

या प्रकरणात खालील 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत: संजय घाडगे (केंद्र संचालक), भागवत कुरुंद, गोरोबा बचूठे, राजश्री माने, वसीम शेख, आर. जी. करडकर, एस. आर. दांगट, विनायक वझे, ताराचंद राठोड, ए. बी. आघाव, पी. के. रसाळ, जी. बी. चक्रे, सी. एस. मुळीक, बी. बी. सुपेकर, यू. डी. उगले, एस. एस. गवई, बाळासाहेब पवार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news