Beed Crime | "तुम्ही आमच्या भांडणात सारखे का पडता?" चिंचवणमध्ये मुलाकडून वृद्ध पित्याचा विटेने ठेचून खून

नातवाच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा; आरोपी काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
Beed Chinchwan Father Murdered By Son
Beed Chinchwan Father Murdered By Son Pudhari
Published on
Updated on

Beed Chinchwan Father Murdered By Son

वडवणी : वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे घरगुती वादातून मुलानेच आपल्या ७० वर्षीय वडिलांचा विटेने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वृद्ध वडिलांवर झालेल्या या हल्ल्यामुळे गावात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मृताचे नातू शुभम फुलचंद कोठुळे (वय २०, रा. चिंचवण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे वडील फुलचंद श्रीकिसन कोठुळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), ११५(२) व ३५१(२) अन्वये खुनाचा गुन्हा वडवणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Beed Chinchwan Father Murdered By Son
Beed Crime News : बीडमध्ये संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान कोठुळे कुटुंबात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी कुटुंबातील ज्येष्ठ श्रीकिसन भागोजी कोठुळे (वय ७०) यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचाच राग मनात धरून आरोपी फुलचंद कोठुळे याने, "तुम्ही आमच्या भांडणात सारखे का पडता?" असे म्हणत अंगणातील वीट उचलून वडिलांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर घाव घातल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्यात श्रीकिसन कोठुळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील किरकोळ वादाचे काही क्षणांतच हत्येत रूपांतर झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Beed Chinchwan Father Murdered By Son
Beed Crime : RTIला बगल महागात; सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २च्या तत्कालीन जन माहिती अधिकाऱ्याला 5 हजारांचा दंड

घटनेनंतर मंगळवारी (दि. २८) शुभम कोठुळे यांनी वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला काही तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे करीत असून, कौटुंबिक वादाचे नेमके कारण, घटनेची पार्श्वभूमी आणि अन्य पुरावे यांचा सखोल तपास सुरू आहे.

कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चिंचवण गावात शोककळा पसरली आहे. आयुष्यभर मुलाचा सांभाळ करणाऱ्या वडिलांचाच जीव मुलाच्या हातून गेल्याने नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news