व्हायरल ऑडिओ क्‍लिप : शिवसेना जिल्‍हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

बीड : कुंडलिक खांडे, शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Beed: Case registered against Kundlik Khande, Shivraj Bangar
बीड : कुंडलिक खांडे, शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल Pudhari Photo

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिप मध्ये मी पंकजा मुंडेंना धोका दिला, याबरोबरच धनंजय मुंडे यांची गाडी फोडू, त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या विरोधात आवाज उठवू अशा पद्धतीचे तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता परळी पोलीस ठाण्यात नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराड यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed: Case registered against Kundlik Khande, Shivraj Bangar
Monsoon Update| राज्यभरात पावसाची हजेरी; मुंबईत 35 मिमी पावसाची नोंद

वाल्मीक कराडांकडून फिर्याद दाखल

मी पंकजाताईंना जाणीवपूर्वक धोका दिला, 376 बूथ बजरंग बाप्पांच्या ताब्यात दिले एवढेच नाही तर निवडणुकीत बजरंग बाप्पांना पैसाही पुरविला तसेच धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्याबाबतीत आक्षेपार्ह शिव्या दिल्याची वक्तव्येही या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचे दिसून येते. ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप व यातील संवाद शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यामधील असल्याचे समोर आले आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक करू, त्यांची गाडी फोडू अशा प्रकारची काही सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्येही ऐकायला मिळतात. या वरूनच आता परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराड यांनी पोलिसात धाव घेतली आहे. या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल करून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्ये करून ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Beed: Case registered against Kundlik Khande, Shivraj Bangar
CM Eknath Shinde|उद्धव ठाकरे यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर पोहोचणार नाही

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात त्‍यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पो.नि. लोहकरे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news