Beed|देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अवैध डीजेवर आष्टी पोलिसांची कारवाई; चालक-मालकांवर कारवाईचा बडगा

Ashti police illegal DJ action- देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अवैध डीजेवर आष्टी पोलिसांची कारवाई;चालक-मालकांवर कारवाईचा बडगा
DJ Ban During Festivals
DJ BanPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कडा (बीड) : देवी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आष्टी पोलिसांनी अवैध डीजे चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात डीजे वाजविण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

DJ Ban During Festivals
Beed killed case solved|प्रियकराची दोन मुले अन्‌ मित्रांनी मिळून केला गुन्हा, जिवाचीवाडी परिसरातील महिलेच्या खुनाचे अखेर उकलले गूढ

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ११ ऑक्टोबर रोजी ब्रह्मगाव फाटा, वनवेवाडी आणि कानडी शिवार परिसरात डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अवारे तसेच पोलीस कर्मचारी शेख, पाखरे, नवले आणि लोंढे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन डीजे बंद केला.

DJ Ban During Festivals
Beed News : अमोल खुणे हल्ला प्रकरणी तिघांना अटक

त्यानंतर संबंधित डीजे चालक व मालकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आष्टी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news