Beed killed case solved|प्रियकराची दोन मुले अन्‌ मित्रांनी मिळून केला गुन्हा, जिवाचीवाडी परिसरातील महिलेच्या खुनाचे अखेर उकलले गूढ

Beed killed case solved- जीवाचीवाडी परिसरात आढळलेल्या महिलेच्या खून प्रकरणी दोन संशयितांना एलसीबीने घेतले ताब्यात
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

केज: केज तालुक्यातील एक विवाहित महिला ही पतीसोबत न राहता अन्य एका विवाहित इसमासोबत पती-पत्नी सारखे राहत होती. अज्ञातांनी तिचा खून करून प्रेत जीवाचीवाडी आणि चिखलबीड सीमेवर एका ठिकाणी पुरलेले होते. मात्र दि.न ११ ऑक्टोबर रोजी तिचे प्रेत जंगली प्राण्यांनी उकरून ओढत नेले असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. त्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबतची स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, केज तालुक्यातील शिरूर माहेर असलेली ४० वर्षीय महिला हिचे लग्न तुकुचीवाडी येथील बाबुराव रघुनाथ चौरे यांच्या सोबत झाले होते. परंतु ती विवाहित महिला तिच्या पतीसोबत न राहता ती जीवाचीवाडी येथील बाळकृष्ण बाबुराव चौरे यांच्या सोबत पती-पत्नी सारखे राहत होते.

दरम्यान अज्ञात व्यक्तींनी तिचा खून करून तिचे प्रेत हे जीवाचीवाडी आणि चिखलबीड (ता. वडवणी) यांच्या हद्दीत पुरून टाकले होते. परंतु दि. १२ ऑक्टोबर रोजी तिचे प्रेत जंगली प्राण्यांनी उकरून उघडले पडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस हेडकॉस्टेबल उमेश आघाव आणि पोलिस कॉन्स्टेबल रशीद शेख हे घटनास्थळी हजर झाले.

त्यांनी अधिक माहिती घेतली. मात्र प्रेत आढळून आलेले ठिकाण हे वडवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर त्यांनी ही माहिती वडवणी पोलिसांना दिली. त्यानंतर वडवणी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रेत ताब्यात घेऊन त्याची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करून गुन्हा नोंद केला.

मृत महिलेचे नाव हे शहाबाई चौरे असल्याचे समजते. वडवणी पोलिस, केज पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास करून दि. १२ ऑक्टोबर रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते.

Crime News
Beed News : बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई; गोळीबार प्रकरणातील आरोपींवर 'मकोका'

त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर शहाबाई चौरे या महिलेचा खून या चौघांनी संगनमत करून केला. त्यानंतर एक दिवस तिचे प्रेत भुस्कटात लपवून ठेवले आणि त्यानंतर ते मृतदेह पोत्यात घालून निर्जनस्थळी नेऊन पुरले. मात्र मृतदेह सडल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे जंगली प्राण्यांनी ते मृतदेह उकरून ओढत नेल्यामुळे या खून प्रकरणाचा उलगडा झाला.

Crime News
Beed News : बीड जिल्ह्यात पोलिसांसमोरच दोन शेतकऱ्यांनी केले विष प्राशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news