Macchindranath Sanjivan Samadhi | मच्छिंद्रनाथ समाधीस्नान सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त; ५० पोलिस अधिकारी, ३५० अंमलदार तैनात

Beed News | ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली.
Macchindranath Sanjivan Samadhi Snan Sohala
Macchindranath Sanjivan Samadhi Snan SohalaPudhari
Published on
Updated on

Macchindranath Sanjivan Samadhi Snan Sohala

कडा : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गुढी पाडव्याच्या आदल्या रात्री अमावस्येच्या दिवशी श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे होणाऱ्या मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी स्नान सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने तब्बल ५० पोलीस अधिकारी, ३५० अंमलदार तसेच सुमारे ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला वर्षातून एकदाच उघडण्यात येणाऱ्या या संजीवन समाधी दर्शनासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.त्यामुळे यंदाही मोठी गर्दी अपेक्षित असून, भाविकांच्या सुरक्षिततेसह सुरळीत दर्शनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Macchindranath Sanjivan Samadhi Snan Sohala
Beed News : कवडगावात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ

यावेळी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून,कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.

समाधीस्नान सोहळा हा नाथ संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा असून, भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा केंद्रबिंदू मानला जातो.तसेच ठिकाणी ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून त्याची माहिती क्यूआर कोड च्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news