CA Exam Result | अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 'सीए' पदाला गवसणी; आष्टी तालुक्यातील हर्षलचे प्रेरणादायी यश

CA Exam Result | सावेडी येथे हर्षलचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण
Harshal Mhaske CA success
हर्षल मस्के Pudhari
Published on
Updated on

Harshal Mhaske CA success

राजू म्हस्के

कडा : दोन ‌दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले, हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला,ता रे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली.... या ओळी आहेत कवी नारायण सुर्वे यांच्या "भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. सारी हयात पोटाची खळगी भागवण्यासाठी केली जाणारी धडपड या कवीनी अतिशय समर्थपणे शब्दांत मांडली आहे.

सुख दुःखाची माळ गुंफूण ‌‌हसत रडत केला जाणारा हिशोबाचा ताळेबंद लावता लावता आयुष्य अलगद निसटून जाते. तारीखचा घोळ संपला की परत एका नववर्षाची सुरूवात होते. यंदाचा या वर्ष सुध्दा स्वप्नपूर्तीसाठी हिशोबाची ताळमेळ करून,सुख दुःखाचा ऋतू संगे नामे जिंदगीची गाडी पुढे ढकलली गेली. नव्या दिशेने,नव्या उमेदीने, नव्या जोमाने पावलाची परिक्रमाकरून निरंतर चालत राहावे मध्येच जरा क्षणभर विसावा घेवून आपल्याच अवतीभोवती असलेल्या मी पणाच वलय झटकून आपल्या माणसाचा भावबंधात जरा थबकून जातो. आयुष्य हे असंच असत. मनासारखं जगण्यासाठी एक वेगळीच तपस्या करावी लागते, ती तपस्या आज पूर्ण करण्यात हर्षल यशस्वी झाला.

Harshal Mhaske CA success
Marathi Students Success CA Exam | सीए परीक्षेतील ‘मराठी’ मुसंडी

आष्टी तालुक्यातील दुष्काळी भागातील गहूखेल सारख्या अति दुर्गम डोंगराळ भागात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले ज्ञानदेव म्हस्के यांची घरची परिस्थिती तशी हलाखीचीच.. पहाडपट्टी सारख्या ग्रामीण भागात कुटुंबाला अगदी जेमतेम शेती असल्याने उदरनिर्वाहासाठी अडचणी येत होत्या. परंतु आहे त्या परिस्थितीत दहावीनंतर इलेक्ट्रिशियन आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात पुणे, हैद्राबाद याठिकाणी काम केले.

त्यांना दोन मुले. दुसरा मुलगा हर्षलने मात्र आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. व त्यांच्या स्वप्नाला मोठी उभारी दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पुण्यातील डेक्कन येथे त्याची आर्टिकलशिप झालेली आहे. परंतु अजूनही एक महिना बाकी असताना त्याने अगोदरच परीक्षा दिल्याने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. अभ्यासात सतत सातत्य ठेऊन कठोर परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) परीक्षा पास झाला आहे.

Harshal Mhaske CA success
Shocking Crime News: लाँग ड्राईव्ह वेळी झाला वाद... CA ने पत्नीचा थेट कात्रीनंच गळा चिरला... पोलिसांनी १८ तासात कसा छडा लावला?

शिवणकाम करून हातभार...

ज्ञानदेव यांच्या पत्नी यांनीही कुटुंबाला हातभार लागावा म्हणून रात्रंदिवस शिवणकाम करून मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही मुलांपैकी एक वडिलांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन शिक्षणात भरारी घेत आहे. तर दुसरा चार्टर्ड अकाउंट सारखी कठीण परीक्षा देऊन यशाचा शिखरावर पोहचला आहे.

कोरोनासारख्या महामारीशी दोन हात....

कोरोनाने ज्ञानदेव म्हस्के यांना घेरले होते,दवाखान्यात मोठया प्रमाणात खर्च करावा लागला, आर्थिक व मानसिक संकट कोसळले. उत्पन्नाचे स्रोत ठप्प आणि आरोग्याची भीती अशा दुहेरी संकटांना सामोरे जात असतानाही एका जिद्दी वडिलांनी हार न मानता परिस्थितीशी दोन हात केले पण मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.

Harshal Mhaske CA success
CA Job | नववर्ष सीएंसाठी लाख मोलाचे; ८ हजार जणांना नोकऱ्या

हर्षल ने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सावेडी येथे घेतले.उच्च माध्यमिक शिक्षण 11 व 12 वी अहिल्यानगर येथे रेसिडेंशील घेऊन बी. कॉम.ची पदवी न्यू आर्ट अँड कॉमर्स येथून पूर्ण केली. त्यानंतर सी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाला.

शिक्षणामुळे जीवनात आमूलाग्र बदल होतो. वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतून आम्हाला शिक्षणासाठी सतत पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.त्याची जाणीव ठेवून शिक्षणातून वैभव निर्माण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक पाल्याने जाणीव ठेवली, तर जीवनात कोणत्याच बाबींची कमतरता भासणार नाही.

— हर्षल म्हस्के, सीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news