Beed Farmers | आष्टीत मोफत सोयाबीन बियाणे योजनेचा गोंधळ; ३१ शेतकरी टोकनपासून वंचित, कृषी विभागाच्या कारभारावर नाराजी

ऑनलाइन अर्ज करूनही ना टोकन मिळाले, ना बियाणे,” अशी तक्रार शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केला
Ashti Soybean Seed Distribution Issue
ऑनलाइन अर्ज करूनही ना टोकन मिळाले, ना बियाणे,” अशी तक्रार शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केलाPudhari
Published on
Updated on

Ashti Soybean Seed Distribution Issue

कडा : राज्य शासनाच्या मोफत सोयाबीन बियाणे वितरण योजनेत आष्टी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. सालेवडगाव येथील तब्बल ३१ शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करूनही टोकन न मिळाल्याने शेतकरी वंचित राहिले असून कृषी विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पेरणीचा हंगाम तोंडावर असतानाही लाभार्थी शेतकऱ्यांना टोकन मिळवण्यासाठी वारंवार कृषी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे समोर आले आहे. “ऑनलाइन अर्ज करूनही ना टोकन मिळाले, ना बियाणे,” अशी तक्रार शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर कृषी कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “बियाणे मिळाल्याशिवाय परत जाणार नाही,” अशी भूमिका घेतली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

Ashti Soybean Seed Distribution Issue
Beed news | शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी नेत्यांचा कृषीमंत्र्यांना घेराव

सालेवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टोकन न मिळाल्यास कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, टोकन वाटप, लाभार्थी निवड आणि उपलब्ध बियाणे साठ्याबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ऑनलाइन प्रणाली असूनही अनेक पात्र शेतकरी वंचित राहत असल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“वारंवार कृषी कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही टोकन मिळत नाही. मग आमचा दोष काय?” असा सवाल शेतकरी शिवाजी सुंबे यांनी केला आहे.

Ashti Soybean Seed Distribution Issue
Beed crime | गुन्हा लपवण्याच्या नादात स्वतःच अडकले; बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल

पावसाळा तोंडावर आला असून पेरणीची तयारी सुरू असताना बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या मोफत बियाणे योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला असून तातडीने तोडगा न काढल्यास घेराव, ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोकोसारख्या तीव्र आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news